छ. संभाजीनगर : लग्न सोहळा आटोपून परतत असताना अपघात; माय-लेकाचा मृत्यू

छ. संभाजीनगर : लग्न सोहळा आटोपून परतत असताना अपघात; माय-लेकाचा मृत्यू
Published on
Updated on

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पाहुण्याच्या लग्नाचा कार्यक्रम आटपून गावाकडे परत जात असताना झालेल्या अपघातात आई व मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पैठण रोडवर बोलोरो-दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने रविवारी (दि.५) हा अपघात झाला. मुमताज राजू शेख व समीर राजू शेख ( दोघेही रा. लिंबेजळगाव ता. गंगापूर) अशी मृत्यू झालेल्या माय- लेकाची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, गंगापूर तालुक्यातील लिबेजळगाव येथील मुमताज शेख या आपला मुलगा समीर याच्याबरोबर हादगाव (ता. शेवगाव) येथे पाहुण्यांच्या लग्नकार्याला गेले होते. तेथील कार्यक्रम आटपून परत दुचाकीवरून गावी येत असताना छत्रपती संभाजीनगर -पैठण रोडवर बोलोरो पिकअप (MH 16 -AY 8212) वाहनाची त्यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली. अपघातात मुमताज शेख व समीर शेख हे दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय देशमुख व पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारापुर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी बोलेरो वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे करत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news