Abuse of a minor girl: जिंतूरमधील ‘त्या’ प्रकरणात अत्याचाराचा गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार | Abuse of a minor girl | पुढारी

Abuse of a minor girl: जिंतूरमधील 'त्या' प्रकरणात अत्याचाराचा गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार | Abuse of a minor girl

जिंतुर: (Abuse of a minor girl) शहरातील संभाजी नगर भागात असलेल्या शिवनेरी लॉजवर जिंतूर पोलिसांनी सोमवार २२ मे रोजी छापा टाकला होता. यामध्ये दोन जोडप्यांना ताब्यात घेण्यात आले होते. या जोडप्यामधील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे पुढे आले आहे. सदर प्रकरणी पिडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून दोन जणांवर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार: (Abuse of a minor girl)

जिंतूर शहरामधील शिवनेरी लॉज येथे अश्लिल प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर माहिती वरुन जिंतूर पोलिसांच्या पथकाने लॉजवर छापा टाकला, यावेळी त्यांना दोन जोडपे मिळून आले. यातील एक मुलगी अल्पवयीन आहे. सदर प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने जिंतूर पोलिसात तक्रार दिली.आरोपीने मुलीसोबत इंस्टाग्रामवर मैत्री करुन सोमवारी दुपारी सटवाई पुलाजवळ बोलावून घेतले त्यानंतर जिंतूर येथील शिवनेरी लॉजवर नेले सदर ठिकाणी मुलीसोबत अश्लिल चाळे करत तिचा विनयभंग (Abuse of a minor girl)  केला. याच दरम्यान जिंतूर पोलिसांनी छापा टाकून जोडप्यांना ताब्यात घेतले.

यातील अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार (Abuse of a minor girl)  झाल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी पिडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संतोष जनार्धन ठोंबरे यांच्यावर विविध कलमांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अल्पवयीन मुलीचे ओळखपत्र न तपासता लॉजवर रूम उपलब्ध करुन दिल्या प्रकरणी अक्षय बाबाराव जावळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निता कदम करत आहेत.

हेही वाचा :

 

Back to top button