Lok Sabha Election 2024 : आंध्रप्रदेश : मतदान केंद्रावर आमदाराकडून मतदाराला मारहाण

Lok Sabha Election 2024 : आंध्रप्रदेश : मतदान केंद्रावर आमदाराकडून मतदाराला मारहाण

 पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) चौथ्या टप्प्यात आज सकाळी ७ वा. पासून मतदान सुरू झाले आहे.  देशभरात ९६ जागांसाठी १७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान आंध्रप्रदेशमध्ये आमदाराकडून मतदाराला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाचे आमदार ए शिवकुमार यांनी केली आहे. अद्याप मारहाणीचे कारण समजलेले नाही. (Lok Sabha Election 2024)

मतदाराला मारहाण

  • देशात सार्वत्रिक निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे.
  • दरम्यान आंध्र प्रदेशमधील मतदान केंद्रावर धक्कादायक घटना घडली.
  • वायएसआर काँग्रेस पक्षाच्या आमदाराकडून मतदाराला मारहाण
  • मारहाणीचे कारण स्पष्ट झालेले नाही.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशात आज (दि.१०) १० राज्यांच्या  ९६ जागांसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ११, आंध्र प्रदेशातील २५, बिहारमध्ये ५, झारखंडमध्ये ४, मध्य प्रदेशात ८, ओडिशात ४, तेलंगणात १७, उत्तर प्रदेशात १३, पश्चिम बंगालच्या ८ आणि जम्मू-काश्मीरच्या एका जागेचा त्यात समावेश आहे. (Lok Sabha Election 2024)

काय आहे प्रकरण 

दरम्यान आंध्र प्रदेशमधील गुंटूरमधील एका मतदान केंद्रावर धक्कादायक घटना घडली आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाचे  आमदार ए शिवकुमार यांनी मतदाराला मारहाण केली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ए शिवकुमार यांनी मतदाराला कानशिलात मारली, त्यानंतर याला प्रत्युत्तरही मतदाराने कानशिलात मारत दिले. दोघांच्यात मारहाण झाल्यानंतर ए शिवकुमार यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदाराला मारहाण करण्यात आली आहे. पण मारहाणीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news