दिव्यांका त्रिपाठी प्रेमात इतकी वेडी होती की, आपलं प्रेम वाचवण्यासाठी ‘नको त्या’ केल्या…

दिव्यांका त्रिपाठी
दिव्यांका त्रिपाठी
Published on
Updated on

ढारी ऑनलाईन डेस्क : आपण आपल्या बॉयफ्रेंडच्या प्रेमात इतके गुंतून जातो की, त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतो. असाच एक प्रसंग टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीसोबत घडला होता. एक काळ असा होता की दिव्यांका त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा ​​यांची जोडी खूप चर्चेत होती. त्यांनी 'बनू में तेरी दुल्हन'मध्ये एकत्र काम केले होते. त्याचवेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. तब्बल ८ वर्षे लॉन्ग रिलेशनशीपमध्ये दोघेही होते. पण त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते.

विचित्र लोकांना का भेटायची दिव्यांका?

ही घटना सांगताना दिव्यांका खूप भावूक झाली. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ती बोलताना दिसते की, , "८ वर्ष, त्यावेळी आयुष्य संपल्यासारखं वाटलं. मी सर्व काही करून पाहिलं आणि अंधश्रद्धाळू बनले, मला विश्वासच बसत नव्हता की मी हे करेल. मी माझं प्रेम वाचवण्यासाठी खूप विचित्र लोकांकडे गेले. आणि त्यांना विचारू लागलो की त्यांच्याशी कोणी काही केले आहे का? ८ वर्षांनंतर असे कसे होऊ शकते? मग एकदा मला विचार आला की, आपलं प्रेम वाचवण्यासाठी हे सर्व करावं लागतयं. अशा प्रेमाचा काय फायदा? मग मी त्यातून बाहेर पडायचं ठरवलं. मी सर्व काही थांबवलं आणि हे समजायला मला थोडा वेळ लागला."
आज दिव्यांकाचे लग्न विवेक दहियाशी झाले आहे.

कोण आहे विवेक दहिया?

विवेक दहिया टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. या कपलच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. दिव्यांकाशी लग्न करण्याआधी विवेक खूप घाबरला होता. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, मला या गोष्टीची काळजी होती की, मी इतक्या मोठ्या अभिनेत्रीचा खर्चकसे करू शकेन?

दिव्यांकाची विवेक दहियाशी कशी झाली होती भेट?

विवेकने सांगितलं की, दिव्यांकाशी भेट एका मित्र पंकज भाटियामुळे झाली होती. तो नेहमी मला त्रास द्यायचा, शिव्या द्यायचा. त्याने विचार केला की, हा मुलगा दिव्यांकासाठी चांगला आहे. त्याने दिव्यांकाच्या आईला फोन केला आणि माझ्याविषयी सांगितले.

हेदेखील वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news