श्रीकृष्ण मंदिरात गुरूवारपासून सुवर्ण महोत्सवी त्रिदोष नाशात्मक कोटी नामस्मरण जपयज्ञाचे आयोजन | पुढारी

श्रीकृष्ण मंदिरात गुरूवारपासून सुवर्ण महोत्सवी त्रिदोष नाशात्मक कोटी नामस्मरण जपयज्ञाचे आयोजन

उमरखेड; पुढारी वृत्तसेवा:  येथील महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीकृष्ण ज्ञान मंदिरात गुरूवार ( दि,१)  डिसेंबरपासून श्रीमद्भगवद्गीता जयंती निमित्त सुवर्ण महोत्सवी त्रिदोष नाशात्मक कोटी नामस्मरण जपयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात, प्रसाद, बांधणी, अभिषेक, धर्म प्रबोधन, किर्तन व प्रवचन अशा विविध ज्ञानपयोगी विषयांवर संतमंहतांचे मार्गदर्शन होणार आहे. अशी माहिती येथील आचार्य तपस्विनी फुलाताई संन्यासी महानुभाव यांनी दिली.

१ डिसेंबर ते ३ डिसेंबर अशा तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये दररोज सकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान परमपूज्य श्री. न्यांसबास बाबा महानुभाव (मकरधोकडा). कंधारकर बाबा महानुभाव, खामनीकर बाबा महानुभाव, अमृते बाबा महानुभाव (ढाणकी), हरिपाळ बाबा जयत्कर्ण, (लातूर),  माहूरकर बाबा महानुभाव आदी प्रमुख आचार्य गण उपस्थित असतील.

याशिवाय दुतोंडे बाबा महानुभाव, लाड बाबा महानुभाव, हरसुल. गोवर्धनकर बाबा महानुभाव, बांभिरकर बाबा, कल्याणकर बाबा महानुभाव, रेवणाईसा बाईजी पंजाबी (दिल्ली), सुशिलाबाई जयत्कर्ण, पुणे. कृष्णाबाईजी पंजाबी (मेरठ). व परिसरातील महानुभाव पंथीय संत महंताची उपस्थिती असणार आहे.

या निमित्याने शुक्रवार (दि. २) डिसेंबर रोजी उमरखेड शहरातून  भव्य शोभायात्रा देखील काढण्यात येणार आहे. शनिवार (दि. ३) डिसेंबर रोजी गीता जयंती महोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रातकाळी तीन वाजता गीता पूजन करण्यात येईल. त्यावेळी एक लक्ष पुष्पांपर्ण तसेच दोन लक्ष दीप प्रज्वलीत होणार आहे. त्यानंतर धर्मसभा, महाआरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. या सर्व कार्यक्रमांना परिसरातील भाविक भक्तांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून या अपूर्व मंगलमय सोहळ्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन येथील सदभक्त मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचलंत का? 

Back to top button