आठवड्याला ३ दिवस सुटी, ४ दिवस काम : या देशातील १०० कंपन्यांचा निर्णय – 4 Day Week in UK | पुढारी

आठवड्याला ३ दिवस सुटी, ४ दिवस काम : या देशातील १०० कंपन्यांचा निर्णय - 4 Day Week in UK

आठवड्याला ३ दिवस सुटी, ४ दिवस काम : या देशातील १०० कंपन्यांचा निर्णय

पुढारी ऑनलाईन : कर्मचाऱ्यांना काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल राखता यावा म्हणून बऱ्याच कंपन्यांत आठवड्याला ५ दिवस काम आणि २ दिवस सुटी दिली जाते. विशेषतः मेट्रो शहरांत आणि त्यातही आयटी कंपन्यात हे चित्र पाहायला मिळते. पण ब्रिटनमधील १०० कंपन्यांनी याही पुढे जात कर्मचाऱ्यांना आठवड्याला ४ दिवस काम आणि ३ दिवस सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणतीही कपात केली जाणार नाही. (4 Day Week in UK)

या शंभर कंपन्यात मिळून २६०० कर्मचारी आहेत. हा निर्णय घेणाऱ्या कंपन्यात अॅटम बँक आणि मार्केटिंग कंपनी Awin यांचा समावेश आहे.

Awin या कंपनीचे सीईओ अॅडम रॉस यांनी कंपनीच्या इतिहासातील हा क्रांतिकारक निर्णय असल्याचे म्हटले आहे. ४ दिवसांचा आठवडा ठेवलात तर कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढेल असे काहींचे मत आहे. यूके कॅपेनच्या वतीने ७० कंपन्यात ४ दिवसांचा आठवडा करण्याबद्दल पथदर्शी प्रकल्प सुरू आहे. युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि बोस्टन कॉलेज, ऑटॉनॉमी ही संस्था यावर संशोधन करत आहेत.

या पथदर्शी प्रकल्पात सहभागी ८८ टक्के कंपन्यांनी ४ दिवसांचा आठवडा हा प्रकल्प योग्य पद्धतीने कार्यरत असल्याचे नमुद केले होते.
आता ४ दिवसांचा आठवडा ही संक्लपना स्वीकारणाऱ्या कंपन्यांत बहुतांश सेवा क्षेत्राताली आहेत.

हेही वाचा

Back to top button