नांदेड-औरंगाबाद मार्गावरील वटवृक्ष प्रत्यारोपणास सुरुवात | पुढारी

नांदेड-औरंगाबाद मार्गावरील वटवृक्ष प्रत्यारोपणास सुरुवात

चारठाणा (परभणी), पुढारी वृत्‍तसेवा : नांदेड- औरंगाबाद महामार्गावर रोडच्या दोन्ही बाजूंना चारठाणा ते मंठा दरम्यान हजारो वर्षापूर्वीची वटवृक्ष आहेत; रस्‍ता रुंदीकरण होत असल्याने ती झाडे तोडण्यात येत आहेत. जिंतूर तालुक्यातील अनेक वृक्षप्रेमी त्यास विरोध केला; परंतु रस्‍ता रुंदीकरणात ही झाडे काढावी लागणार निश्चित होते. झाडे वाचवण्यासाठी प्रयत्नशील अभिनेते सयाजी शिंदे व कंत्राटदार बी. आर घोडके यांनी आश्वासन दिले. आज या झाडांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यारोपण करण्यास सुरुवात झाल्‍याने वृक्षप्रेमीतून आनंद व्यक्त केला जात आहे.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, नांदेड-औरंगाबाद या महामार्गावरील चारठाणा ते मंठा दरम्यान रोडच्या दोन्ही बाजूंनी वटवृक्षांची हजारो वर्षांपूर्वीची झाडे आहेत. परंतु काळानुसार या रस्‍त्‍याचे रुंदीकरण करण्यात येत असल्याने यात ही झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे येथील वृक्षप्रेमी मॉर्निंग ग्रुप चारठाणा, झाड फाउंडेशन जिंतूर, शब्द सह्याद्री जिंतूर, स्थानिक पत्रकार संघ, शिवशंकर चापोले आदींनी विरोध केला होता. तसेच अनेक आंदोलने देखील करण्यात आली होती.

दरम्‍यान, रुंदीकरणात ही झाडे तोडण्यात येणार हे निश्चित असल्याने ही झाडे वाचवण्यासाठी या वृक्षप्रेमींनी अभिनेते, वनराईचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. माहिती मिळाल्‍यानंतर त्यांनी तात्काळ भेट घेवून ही झाडे कशी वाचतील यासाठी कंत्राटदार बि. आर. घोडके यांच्यासह वृक्ष प्रेमींना सोबत घेऊन चर्चा केली होती.

ही झाडे वाचवण्यासाठी आपण संपूर्ण प्रयत्न करणार असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे व कंत्राटदार बि. आर. घोडके यांनी आश्वासन दिले. त्यानुसार काल (दि. 15) कंत्राटदार बि. आर. घोडके यांच्या प्रयत्नातुन ही वटवृक्ष प्रत्यारोपणासाठी इतर ठिकाणी हलवून तेथे प्रत्यारोपण करण्यासाठी सुरुवात झाली आहे. त्यातील अनेक वटवृक्ष घोडके कंट्रक्शनवरच प्रत्यारोपण करण्यात येत आहेत त्यामुळे वृक्षप्रेमीमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा 

Back to top button