आमच्यातील एकही जण ईडीच्या भीतीने आलेला नाही : एकनाथ शिंदे | पुढारी

आमच्यातील एकही जण ईडीच्या भीतीने आलेला नाही : एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमच्याकडे एकही आमदार, खासदार ईडीच्या भीतीने आलेला नाही, दडपशाहीने कोणी येत असेल तर येऊ नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. सिल्लोड येथील मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असताना आणि मोठे संख्याबळ असातानाही देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने उपमुख्यमंत्रीपद स्विकारल्यामळे एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.

शिवसैनिकांवर खोट्या केसेस केल्या जात होत्या, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात निधी दिला जात होता. आमच्यावर होत असलेल्या या अन्यायाला उत्तर देण्यासाठी आम्ही भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मी सध्या महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी जातो तिथे लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आम्ही सत्तापिपासू असतो तर लोकांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नसता, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.

हेही वाचलंत का?

Back to top button