काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री करणार ट्विटर अकाउंट बंद, निर्णयाबाबत म्हणाले… | पुढारी

काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री करणार ट्विटर अकाउंट बंद, निर्णयाबाबत म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सोशल मीडियावर चर्चेत असतात. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटानंतर ते खूप चर्चेत आले होते. आता सोशल मीडियाशी संबंधित केलेल्या एका घोषणेमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक पोस्ट करत मोठा निर्णय जाहीर केला आहे.

अग्निहोत्री यांनी निर्णय घेतला आहे ?

विवेक अग्निहोत्री हे ट्विटरवर सर्वाधिक सक्रीय असल्‍याचे पहायला मिळतात. ट्विटरच्या माध्यमातून ते प्रत्येक मुद्यावर आपली मते मांडतात. पण सध्या असं नेमकं काय घडलं आहे हे समजलं नाही, ज्यामुळं त्यांनी ट्विटर अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विवेक अग्निहोत्रीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेवटच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “माझ्यासाठी काहीतरी अधिक चांगले करण्याचा विचार करण्याची ही वेळ आहे. त्यामुळे मी काही काळासाठी ट्विटर निष्क्रिय करत आहे. लवकरच भेटू.”

या ट्विटनंतर लोक असा अंदाज लावत आहेत की, कदाचित विवेक त्यांच्या आगामी चित्रपट अधिक जास्त चांगले बनविण्यावर भर देत आहेत. या विचारांनी त्यांनी ट्विटर अकाउंट बंद करण्‍याचा  निर्णय घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा

Back to top button