केजरीवाल गप्प का? स्वाती मालीवाल प्रकरणी निर्मला सीतारामन यांचा सवाल  | पुढारी

केजरीवाल गप्प का? स्वाती मालीवाल प्रकरणी निर्मला सीतारामन यांचा सवाल 

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभा खासदार आणि आपच्या नेत्या स्वाती मालीवाल यांनी त्यांना झालेल्या मारहाणीनंतर तीन-तार दिवस पोलिसांत तक्रार केली नाही. याचा अर्थ त्यांच्यावर दबाव होता. असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. १३ मे च्या दिवसापासून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्याच पक्षाच्या राज्यसभा खासदाराबाबतीत एक शब्दही बोलला नाही. या प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी समोर येऊन माफी मागावी, अशी मागणी सीतारामन यांनी केली आहे. जाणून घ्या प्रकरण काय आहे. (Swati Maliwal Case)

काय म्हणाल्या निर्मला सीतारामन

  • राज्यसभा खासदार आणि आपच्या नेत्या स्वाती मालीवाल यांना मारहाण.
  • मारहाणीनंतर स्वाती मालीवाल यांनी पोलिसांत तक्रार का केली नाही?
  • स्वाती मालीवाल यांच्यावर दबाव होता.

स्वाती मालीवाल यांनी तक्रार का नोंदवली नाही? : निर्मला सीतारामन

स्वाती मालीवाल यांना मारहाण झालेल्या मारहाण प्रकरणी बोलत असताना भाजप नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “स्वाती मालीवाल मारहाण झाल्यानंतर तीन-चार दिवस का गप्प होत्या. त्यांनी पोलिसांत आपली तक्रार का नोंदवली नाही? याचा अर्थ असा होतो की, त्यांच्यावर दबाव आहे आणि त्यांच्या मनावरही दबाव आहे.

काय आहे प्रकरण? 

दिल्लीच्या मुख्यमंत्री सदनात राज्यसभा खासदार आणि आपच्या नेत्या स्वाती मालीवाल यांना सोमवारी (दि. १३) अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. स्वाती मालीवाल यांनी गैरवर्तन प्रकरणानंतर मौन बाळगले होते. दरम्यान, गुरुवारी (दि.१६) दिल्ली पोलिसांनी मालीवाल यांचा जबाब नोंदवला. परंतु पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मालीवाल यांनी पोस्टमध्ये म्हणले आहे की, ” माझ्यासोबत जे घडलं ते खूप वाईट होतं. गेलेले दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेले. देशात महत्त्वाच्या निवडणुका सुरू आहेत, स्वाती मालीवाल महत्त्वाच्या नाहीत, देशाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. भाजपवाल्यांना विशेष विनंती आहे की या घटनेवर राजकारण करू नका.” Swati Maliwal Case

मारहाणप्रकरणी विभव कुमार यांना अटक

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी विभव कुमार यांच्यावर गुरुवारी (१६ मे) दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विभव कुमार यांनी गैरवर्तन केल्याची तक्रार मालीवाल यांनी दाखल केली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली.  तर या प्रकरणात स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवालांचे नाव घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा 

Back to top button