बीड : दारूच्या नशेत मुलाने केलेल्या मारहाणीत वडिलाचा मृत्यू | पुढारी

बीड : दारूच्या नशेत मुलाने केलेल्या मारहाणीत वडिलाचा मृत्यू

केज; पुढारी वृत्तसेवा : वडील दारू पितात म्हणून मुलाने दारूच्या नशेत वडिलांना मारहाण केली. त्यात जखमी झालेल्या वडिलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, युसुफ वडगाव (ता. केज) येथे रविवारी सायंकाळी ५ .३० च्या दरम्यान मल्हारी निवृती लगसकर याने स्वतः दारू पिऊन त्याचे वडील निवृती कोंडिबा लगसकर (वय ७०) यांना दारू पितात, म्हणून मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने निवृत्ती लगसकर यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी निवृत्ती यांचा दुसरा मुलगा पोपट निवृत्ती लगसकर याने फिर्याद दिली. त्यावरून मल्हारी निवृती लगसकर याच्याविरुद्ध युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख अधिक तपास करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button