परभणी: मोरेगाव येथे शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा निर्घृण खून | पुढारी

परभणी: मोरेगाव येथे शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा निर्घृण खून

सेलू , पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मोरेगाव येथील मोरेश्वरी मंदिरात जेवणाची पंगत चालू असताना शेतजमीनच्या वादातून मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावावर धारदार शस्त्राचे वार करीत खून केला. ही घटना सोमवारी (दि. २९) रात्री सात ते आठच्या दरम्यान घडली. या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

मधुकर मारोतराव मगर (वय ३८ रा. मोरेगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मृताची पत्नी अलका मधुकर मगर (वय ३१) यांनी आज (दि.३०) दुपारी फिर्याद दिली‌. आरोपी राजेभाऊ मगर याने मृताच्या गळ्यावर, डाव्या पायावर, तोंडावर व छातीच्या डाव्या बाजुस चाकुने वार करुन त्याचा खून केला , असे फिर्यादीत म्हटले आहे. यावरुन आरोपी राजेभाऊ ऊर्फ अशोक मारोतराव मगर (वय ४३, रा. मोरेगाव) याच्यावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जमीन परत घेतल्याच्या कारणावरून दोन्ही भावांमध्ये वाद होता, असे समजते. घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक सुनील ओव्हाळ, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button