

मढी : पाथर्डी तालुक्यातील मढी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भगवान मरकड यांच्या नेतृत्वाखाली चैतन्य कानिफनाथ शेतकरी विकास पॅनेलने सर्व 13 जागा जिंकून संस्थेवरील सत्ता कायम राखली आहे.
तालुक्यातील प्रतिष्ठेच्या मढी सेवा सोसायटीच्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीकडे तालुक्याच्या राजकीय जाणकारांचे लक्ष होते. मढी सेवा संस्थेची निवडणूक भगवान मरकड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनेलने लढवली. त्यांच्या विरोधात माजी सरपंच देवीदास मरकड व सरपंच संजय मरकड, उपसरंपच रवींद्र आरोळे यांच्या नेतृत्वाखाली सद्गुरू कानिफनाथ शेतकरी विकास मंडळाला पराभवाला सामोरे जावे लागले. मढीच्या शेतकर्यांचा सोसायटीच्या माध्यमातून सर्वांगिण विकास करू, असे आश्वासन माजी सरपंच भगवान मरकड व त्यांच्या सहकार्यांनी दिले.
निवडणुकीचा निकाल जाहीर होताच ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या निवडणुकीचे नेतृत्व भगवान मरकड यांनी अतिशय कौशल्याने नियोजन करून केल्याने त्यांना हा विजय खेचून आणला. विजयी उमेदवार : भगवान सूर्यभान मरकड, दादासाहेब शिवराम मरकड, भाऊसाहेब जनार्धन मरकड, म्हातारदेव गोपीनाथ मरकड, विष्णू श्रीराम मरकड, विष्णू रामभाऊ मरकड, सुखदेव धोंडीराम मरकड, साहेबा अश्रू आरोळे, लता संजय मरकड, विजया राधाकिसन मरकड, विष्णू रामभाऊ मरकड, अशोक रंगनाथ मरकड, शंकर नामदेव पाखरे.