Thor Love and Thunder: क्रिस हेम्सवर्थचा जडला ध्यानावर जीव, ध्यान मुद्रेत पोस्टर रिलीज | पुढारी

Thor Love and Thunder: क्रिस हेम्सवर्थचा जडला ध्यानावर जीव, ध्यान मुद्रेत पोस्टर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस’नंतर आता मार्वल स्टुडिओजचा आणखी एक चित्रपट धुमाकूळ घालायला तयार आहे. ‘थॉर: लव्ह ॲँड थंडर’ असे चित्रपटाचे नाव आहे. (Thor Love and Thunder) या चित्रपटाचे एक नवे पोस्टर निर्मीत्यांनी रिलीज केला आहे. या पोस्टरला मार्वल स्टुडिओच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलं होतं. नव्या पोस्टरमध्ये चित्रपटाचा मुख्य अभिनेता क्रिस हेम्सवर्थ एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहे. अभिनेत्याचा या नव्या लुकमुळे लोकांमध्ये आता या चित्रपटाचे हिंदुस्तानी कनेक्शन होण्याची चर्चा चांगलीच होत आहे. (Thor Love and Thunder)

Joker २ : ‘जोकर २’ येतोय; लेडी गागा हार्ले क्वीनच्या भूमिकेत?

पोस्टरमध्ये दिसतं ‘थॉर’

चित्रपटाचे पोस्टर जारी होताच सगळीकडे क्रिस हेम्सवर्थ चर्चा झाली. पोस्टरमध्ये क्रिस ध्यान मुद्रामध्ये दिसत आहे. केशरी रंगाचे कपडे धारण करून तो ध्यानमुद्रा पोस्टरमध्ये दिसत आहे. नव्या लूकवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत केलं गेलं आहे. ज्यामुळे भारतीय प्रेक्षकांचं अधिक लक्ष सोशल मीडियावर जाण्याची शक्यता आहे.

दमदार ट्रेलर रिलीज

‘थोर: लव्ह अँड थंडरचा ट्रेलर रिलीज केला गेला असता. इंडिया मार्वलने त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर त्याचा हिंदी ट्रेलर रिलीज केला, ज्याला लोकांनी खूप पसंती दिली. दोन मिनिटे आणि १४ सेकंदांच्या या ट्रेलरला २.५ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. ट्रेलरमध्ये ‘गार्डियन ऑफ द गॅलेक्सी’ची व्यक्तिरेखा कोर्ग थोरची कथा सांगताना दिसत आहे. या दरम्यान, तो थोरच्या परिवर्तनापासून त्याच्या प्रेमापर्यंतच्या घटनांबद्दल मुलांना सांगतो.

या दिवशी हाेणार चित्रपट प्रदर्शित

क्रिस हेम्सवर्थचा चित्रपट 8 जुलै रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार होता. परंतु आता तो 7 जुलै रोजी भारतात प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटामुळे भारतीय प्रेक्षकांना तीन वर्षांनंतर ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’मधील थॉरला पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. ख्रिस हेम्सवर्थ आणि नताली पोर्टमॅन ही ब्लॉकबस्टर जोडी चित्रपटातून पुन्हा मोठ्या पडद्यावर परतणार आहे.

हेदेखील वाचा-

Back to top button