कोल्हापूर: हुपरीत श्री दुर्गामाता दौडमध्ये हजारो तरुणांचा सहभाग | पुढारी

कोल्हापूर: हुपरीत श्री दुर्गामाता दौडमध्ये हजारो तरुणांचा सहभाग

अमजद नदाफ

हुपरी: छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो,  हिंदू धर्म की जय, भारतमाता की जय… असा जयघोष करत श्री आंबामाता की जय, श्री दुर्गामाता की जयचा गजर करीत चंदेरीनगरी हुपरी येथे श्री दुर्गामाता दौड काढण्यात आली. यामुळे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. हजारो युवक यावेळी सहभागी झाली होते. श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्तानच्या वतीने मागील २९ वर्षे या दौडचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामदैवत श्री अंबाबाई मातेच्या मंदिरात सकाळी आरती करण्यात आली.

दौड निघालेल्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून पुष्पवृष्टी करून दौडचे स्वागत करण्यात आले. यावेळी आतषबाजीही करण्यात आली. एकीचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दौडमध्ये युवक वर्ग व महिला  मोठया संख्येने सहभागी झाले होते. हातात  भगवा ध्वज घेऊन स्फूर्ती गीत गात दौड काढण्यात आली. श्री अंबाबाई मंदिरात पूजाअर्चा केली जाते. “दौड चालली दौड, शिवभक्तांची दौड ” या स्फूर्ती गीताने पहाटेच्या वेळेस पवित्र वातावरण निर्माण झाले होते.

दौडचे नियोजन  माजी उपसरपंच अजित सुतार, रावसाहेब ढेंगे, अमित नरके, किरण  भिवटे, प्रकाश लोखंडे, प्रवीण वाशीकर, संदिप सिध्दनुर्ले आदीसह तरुणांनी केले.

दरम्यान, नवरात्रोत्सवानिमित्त ग्रामदैवत श्री अंबाबाई माता मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. भक्त मंडळासह सेवेकरी बाराबलुतेदार, मानकरी, पाटील तसेच भक्त मंडळाचे यशवंतराव पाटील यांनी कार्यक्रमांचे  नियोजन केले आहे. श्रीपूजक स्वामी, गुरव बंधु श्री अंबाबाई मातेची विविध रुपात पूजा बांधतात.

हेही वाचा 

Back to top button