कोल्‍हापूर : वाघराळीत अज्ञातांकडून दाम्पत्याचा खून? | पुढारी

कोल्‍हापूर : वाघराळीत अज्ञातांकडून दाम्पत्याचा खून?

नेसरी : पुढारी वृत्तसेवा : वाघराळी (ता. गडहिंग्लज) येथील केंद्रीय रेल्वे पोलिस दलातील निवृत्त कर्मचारी सिंधू सुतार व त्यांच्या पत्नी बायाक्का सुतार या दाम्पत्याचे स्वतंत्र खोलीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने लंपास झाले असून, अज्ञात चोरट्यांनी त्यांचा खून केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. बायाक्का यांच्या हातातील फुटलेल्या बांगड्या, मोडलेल्या स्थितीतील प्लास्टिकची खुर्ची पाहता चोरट्यांना प्रतिकार करताना त्यांना जीवे मारले असावे, असा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुतार यांनी काल बँकेतून पैसे काढल्याचे समजते.

आज सकाळी घराचा समोरचा दरवाजा पूर्णपणे उघडलेल्या स्थितीत होता. किमती ऐवजासाठी चोरट्यांनी रेकी करुन त्यांचा घातपात केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. नेसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.

.हेही वाचा 

माणुसकी हरवली ! अपघातानंतर मदत करण्याऐवजी लोक काढत राहिले फोटो

पुणे विद्यापीठाला ऑगस्टमध्येच मिळणार प्र-कुलगुरू

दौंडच्या महाबँकेतील घोटाळेबाज कंत्राटी शिपाई अखेर अटकेत

Back to top button