दौंडच्या महाबँकेतील घोटाळेबाज कंत्राटी शिपाई अखेर अटकेत | पुढारी

दौंडच्या महाबँकेतील घोटाळेबाज कंत्राटी शिपाई अखेर अटकेत

उमेश कुलकर्णी

दौंड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : दौंड शहरालगत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र गोपाळवाडी शाखेमध्ये एक कोटी 73 लाख 37 हजार 983 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेतील कंत्राटी शिपाई परशुराम तुकाराम भागवत (रा. बेटवाडी दौंड) याला बुधवारी रात्री उशिरा दौंड पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी पुण्याचे बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर अमित चंदन मदन चौधरी यांनी दौंड पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
घोटाळ्याचे हे प्रकरण आठवडापुर्वी उघडकीस आले होते, बँकेने याबाबत अंतर्गत चौकशी करून घोटाळ्यातील रक्कम नक्की करून तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा

‘या’ गावात प्राण्यांनाही असते साप्ताहिक सुट्टी!

पुणे : मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचा मार्ग मोकळा

जगातील सर्वात विषारी झाड

Back to top button