कोल्हापूर: हसन मुश्रीफ यांची के. पी. पाटील यांनी घेतली भेट | पुढारी

कोल्हापूर: हसन मुश्रीफ यांची के. पी. पाटील यांनी घेतली भेट

कागल; पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांची माजी आमदार के. पी. पाटील यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत कागलच्या विश्रामगृहात भेट घेतली व त्यांचे अभिनंदन केले.

या भेटीदरम्यान बिद्री साखर कारखान्याच्या विकासात्मक वाटचालीमध्ये असलेल्या विविध अडचणी मंत्री मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यामध्ये कारखान्याचा इथेनॉल प्रकल्पासह विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक रणजीतसिंह पाटील, हुतात्मा स्वामी वारके सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष पंडितराव केणे, बिद्रीचे संचालक धनाजीराव देसाई, उमेशआण्णा भोईटे, राजेंद्र पाटील – सरवडेकर, विश्वनाथ कुंभार, सुनील कांबळे, गोकुळचे माजी संचालक विलास कांबळे, धोंडीराम वारके उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button