कोल्हापूर: अब्दुललाट येथे जैन मुनी हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा | पुढारी

कोल्हापूर: अब्दुललाट येथे जैन मुनी हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा

अब्दुललाट: पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातील चिक्कोडी तालुक्यातील जैन मुनी यांच्या हत्येच्या निषेधार्थ अब्दुल लाट (ता. शिरोळ) येथे जैन समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला.

काही दिवसांपूर्वी आर्थिक व्यवहारातून चिक्कोडी तालुक्यातील हिरीकुडी येथे जैन मुनी श्री 1008 कामकुमार नंदी महाराज यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीचे निवेदन ग्रामविकास अधिकारी, गावकामगार तलाठी आणि पोलीस पाटील तसेच कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना देण्यात आले.

यावेळी सरपंच कस्तुरी कुरुंदवाडे, उपसरपंच स्वप्नील सांगावे, ग्रामपंचायत सदस्य वर्षा पाटील, निलेश नावरे, क्षमा ठिकणे, जैन समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक आप्पासो चौगुले (शामाण), उपसरपंच कल्लापा कुमटोळे, अशोक चौगुले, रावसो पाटील (नांगरे), कल्लापा गडकरी, शरद साखरचे संचालक एस. के. पाटील, जवाहर साखर कारखान्याचे संचालक दादासो सांगावे, सामाजिक कार्यकर्ते सागर सांगावे, प्रशांत आवळे आदींनी मनोगत व्यक्त करत घटनेचा निषेध केला.

यावेळी जैन समाजातील बांधव, महिला भगिनी, ग्रामविकास अधिकारी व्ही. के. रजपूत, गावकागार तलाठी नितीन कांबळे, पोलीस पाटील मानसिंग भोसले आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button