कोल्हापूर : कबनूर येथील जमिनी वर्ग १ करण्याचा निर्णय पुन्हा लांबणीवर | पुढारी

कोल्हापूर : कबनूर येथील जमिनी वर्ग १ करण्याचा निर्णय पुन्हा लांबणीवर

कबनूर; पुढारी वृत्तसेवा : कबनूर गावच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्यासंदर्भात खासदार धैर्यशील माने व आमदार प्रकाश आवाडे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री विखे-पाटील यांनी राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याबाबत योग्य तो निर्णय घेवू, असे आश्वासन दिले. त्यामुळे जमिनी वर्ग १  करण्याचा निर्णय पुन्हा लांबणीवर गेला आहे.

यावेळी कबनूरचे प्रमोद पाटील, बी.डी.पाटील, जयकुमार काडाप्पा, उपसरपंच सुधीर पाटील, बबन केटकाळे, राजू गांधी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button