USB C Type Charger – भारतातही सर्व स्मार्टफोन, लॅपटॉपना सी-टाईप चार्जर

USB C Type Charger – भारतातही सर्व स्मार्टफोन, लॅपटॉपना सी-टाईप चार्जर

पुढारी ऑनलाईन – भारतात सर्व स्मार्टफोन आणि इतर लहान उपकरणांना सी टाईप चार्जर असणार आहे. या संबंधित सर्व औद्योगिक घटकांनी या बदलासाठी सहमती दर्शवली आहे, अशी माहिती ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी दिली आहे. (USB C Type Charger for smart phones)

सर्व प्रकारच्या स्मार्ट उपकरणांना एकच प्रकारचा प्रमाणित चार्जर असावा यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू होते, पण यावर एकमत झालेले नव्हते. पण कमी किंमतीच्या फिचर फोनसाठी वेगळ्या प्रकारचा चार्जिंग पोर्ट असावा, अशी ही चर्चा झालेली आहे.
बुधवारी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज, पर्यावरण मंत्रालय यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यात या विषयावर चर्चा झाली.

सिंग म्हणाले, "स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप यांनी सी टाईप युएसबी चार्जर असावा यावर सर्वसाधारण एकमत झालेले आहे. कमी किमतीच्या फिचर फोनसाठी फक्त वेगळा चार्जिंग पोर्ट असेल." एकच प्रकारचा चार्जिंग पोर्ट दिल्यास ग्राहकांना मोबाईल बदलल्यानंतर नवा चार्जर घ्यायची गरज पडणार नाही, तसेच इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे प्रमाणही कमी होणार आहे.

युरोपियन युनियननेही सर्व स्मार्टफोनना सी-टाईप चार्जर असला पाहिजे, असा नियम केलेला आहे. त्यामुळे अॅपलनेही आयफोनला पुढील वर्षी सी-टाईप चार्जर देणार आहे.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news