INDvsNZ T20 : भारत-न्यूझीलंड पहिला टी 20 सामना रद्द होण्याची शक्यता

INDvsNZ T20 : भारत-न्यूझीलंड पहिला टी 20 सामना रद्द होण्याची शक्यता
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsNZ T20 1st T20 Weather Report : भारत आणि न्यूझीलंड संघ टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. ऑस्ट्रेलियात उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर दोन्ही संघ नव्याने सुरुवात करतील. दोन्ही संघांमध्ये 18 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होत आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर अष्टपैलू हार्दिक पंड्या टीम इंडियाचे नेतृत्व करत असून ऋषभ पंत उपकर्णधार आहे.

या न्यूझीलंड दौऱ्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना पाठवण्यात आले नाही. त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत युवा खेळाडूंना या दौऱ्यात स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे. दरम्यान, टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी वेलिंग्टनमधून एक निराशाजनक बातमी समोर आली आहे.

न्यूझीलंडच्या हवामान अंदाजानुसार, शुक्रवारी वेलिंग्टनमध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. अहवालानुसार, दुपारी आणि संध्याकाळी पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण राहून जोरदार वाऱ्यासह तापमान 14 अंशांपर्यंत पोहोचू शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना झाल्यास येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकते. टीम इंडिया चौथ्यांदा स्काय स्टेडियमवर खेळणार आहे. यातील दोन सामन्यांत भारतीय संघाचा पराभव झाला असून एक सुपर ओव्हरमध्ये जिंकला आहे.

न्यूझीलंड टी 20 संघ

केन विल्यमसन (कर्णधार), फिन ॲलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, ब्लेअर टिकनर

टीम इंडिया टी 20 संघ

हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप सिंग, अरविंद यादव , हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक

टी 20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना : 18 नोव्हेंबर (शुक्रवार) : वेलिंग्टन
दुसरा सामना : 20 नोव्हेंबर (रविवार) : तौरंगा
तिसरा सामना : 22 नोव्हेंबर (मंगळवार) : नेपियर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news