कोल्‍हापूर: राशिवडेतील द्रोणागिरी कुस्ती संकुल बनले ‘खेलो इंडियाचे’ केंद्र | पुढारी

कोल्‍हापूर: राशिवडेतील द्रोणागिरी कुस्ती संकुल बनले 'खेलो इंडियाचे' केंद्र

राशिवडे (कोल्‍हापूर), पुढारी वृतसेवा : द्रोणागिरी कुस्ती संकुल आता भारतीय खेळ प्राधिकरणाच्या (साई-SAI – Sports Autohrity of India) खेलो इंडियाचे केंद्र म्‍हणून निश्चित करण्यात आले आहे. राज्यातील दुसरे व जिल्ह्यातील पहिले केंद्र आहे. तसेच याचे मंजुरी पत्र संकुलाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

गेली दहा वर्षापासून क्रीडा कुस्ती संकुलाच्यावतीने मल्ल घडविण्याचे काम होत आहे. गावाच्या बाहेर निसर्गरम्य परिसरात अद्यावत संकुल असून येथे मॅटचा आखाडा, मातीचा परंपारिक आखाडा, जिम, स्वतंत्र अभ्यासिका, वसतिगृह, जेवण विभाग, अद्यावत इमारत, निसर्गरम्य असा भव्य परिसर आहे.

तसेच अशा वातावरणात मिळणा-या प्रशिक्षणाचा आणि विविध बाबी लक्षात घेऊन भारतीय क्रीडा प्राधिकरण विभागाच्या वतीने संकुलाची केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्‍यान, याला राज्यातील दुस-या संकुलाचा मान मिळाला. एनआयएस मान्यताप्राप्त प्रशिक्षक व सुविधा दिल्या जाणार आहेत. आज याबाबतचे मंजुरी पत्र भारतीय खेल प्राधिकरणाचे महाराष्ट्र राज्य सल्लागार चंद्रकांत चव्हाण व साईचे कुस्ती प्रशिक्षक हरीश राजोरा यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.

संपूर्ण साई केंद्राचा दर्जा मिळणे ही मोठी गौरवास्पद बाब असून यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना एक दिशा मिळणार आहे. येथील मल्ल निश्चितच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील असा विश्वास यावेळी कुस्ती प्रसिद्ध निवेदक वस्ताद कृष्णात चौगले व एकनाथ चौगले यांनी व्यक्त केला. स्वागत समीर गुळवणी यांनी केले. याप्रसंगी प्रशिक्षक दीपक देवळकर, विलास टिपुगडे, मधुकर शिंदे, विजय तापेकर’ अमर चौगले उपस्थित होते.

हेही वाचा  

पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील 20 गावांमध्ये डिजिटल कॅम्प सुरू

बारामती-फलटण रस्त्यावरील खड्डे बुजणार का? केंद्रीय राज्यमंत्र्यांचा दौरा

बँकेच्या ताब्यातून ‘तनपुरे’ सोडवावा ; प्रा. राऊत यांचे देवळालीतील पत्रकार परिषदेत आवाहन

Back to top button