तारक मेहता फेम दीप्ती साधवानीच्या अदांचा जलवा; कान्समध्ये पडली सगळ्यांवर भारी (Video)

Deepti Sadhwani
Deepti Sadhwani

पुढारी ऑनलाईन न्यूज : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या शोमधून अभिनेत्री आणि गायिका दीप्ती साधवानी हिला लोकप्रियता मिळाली. दीप्ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. यानंतर आता नुकतेच दिप्तीने ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. दरम्यान दीप्ती रेड कार्पेटवर येताच उपस्थिताच्या नजरा तिच्यावर खिळल्या. या खास सोह‍ळ्याचे हॉट फोटोज आणि व्हिडिओज् सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

दीप्ती साधवानीविषयी 'हे' माहित आहे काय? 

  • दीप्ती ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर झळकली.
  • 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या शोत दीप्तीने 'चैरी' नावाची भूमिका साकारली आहे.
  • दीप्ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
  • दीप्तीचा आगामी 'नजर हटी दुर्घटना घटी' हा चित्रपट लवकरच येत आहे.

दीप्ती साधवानी फर गाऊनमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर

अभिनेत्री आणि गायिका दीप्ती साधवानीने नुकतेच ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर मोठ्या दिमाखात हजेरी लावली. यावेळी तिने हॉफ शोल्डर केशरी रंगाचा फर गाऊनवर परिधान केला होता. या गाऊनमध्ये दीप्ती रेड कार्पेटवर येताच चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. या वेशभूषेत दीप्ती खूपच ग्लॅमरस दिसली. याशिवाय दीप्ती गडद पोपटी कलरच्या ड्रेसमध्येही सेलेब्रिटीच्यामध्ये बसलेली दिसली. यावेळी तिने हाताची टाळी वाजवून इतर स्पर्धकांनादेखील चिअरअप केलं आहे.

दीप्तीने मिळविली चाहत्यांची वाहव्वा

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने "फ्रेंच रिव्हिएरा येथे ७७ व्या कान्स चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन समारंभ." असे लिहिलंय. तीन दिवसाच्या या सोहळ्यात दीप्तीने चाहत्यांची वाहव्वा मिळविली. यासोबत दीप्तीचा एका कारमध्ये बसतानाही दिसत आहे. कारमध्ये बसताना तिच्या तोंडतून 'ओ माय गॉड' असे शब्द बाहेर येतात. या सोहळ्यातील काही व्हिडिओ दीप्तीने इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहेत. सुंदर ड्रेससोबत दीप्तीने कानात हिऱ्याचे झुमके आणि हातात ब्रेसलेट, ऑरेंज शेड लिपस्टिक आणि डार्क मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय.

कोण आहे दीप्ती साधवानी?

दीप्ती साधवानी अभिनेत्रीसोबत गायकदेखील आहे. बादशाहच्या 'हरियाणा रोडवे' या म्युझिक व्हिडिओमध्ये ती दिसली आहे. तिने 'मिस इंडिया' या सौंदर्य स्पर्धेतही भाग घेतला होता. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या शोमध्ये दिप्तीने 'चैरी' नावाची भूमिका साकारली होती. फार कमी काळावधीची ही भूमिका असली तरी दिप्तीने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

दीप्तीचा आगामी चित्रपट

वर्कफ्रंटूबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या वर्षी दीप्तीने तिच्या आगामी 'नजर हटी दुर्घटना घटी' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. याशिवाय दीप्ती 'रॉक बँड पार्टी' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news