इचलकरंजी महापालिकेचे शतक; विकासकामांचे अर्धशतक | पुढारी

इचलकरंजी महापालिकेचे शतक; विकासकामांचे अर्धशतक

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी महापालिकेच्या स्थापनेला बुधवारी शंभरी पुर्ण झाली. या काळात आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कामकाजात सुसुत्रीपणा आणत विविध विभागातील तब्बल 50 विकासकामे मार्गी लावली. सुळकूड पाणी योजना, कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलणे, कर आकारणी भरण्यासाठी नवी प्रणालीने एक टप्पा पार केला.

इचलकरंजी नगरपालिकेचे 29 जून रोजी महापालिकेत रुपांतर झाले. आयुक्त देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 1 जुलै पासून महापालिका म्हणून प्रत्यक्ष कामकाजास सुरवात झाली. शहरवासियांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि उत्पन्नावर असलेल्या मर्यादा अशा बिकट परिस्थितीत आयुक्तांनी शंभर दिवसात कामकाजाला शिस्त लावून विकासकामे मार्गी लावण्यावर भर दिला. जनतेला सेवा देण्यावर शंभर दिवसात भर राहिला आहे. हे करीत असताना बहूचर्चित 14 कोटींचे कचरा टेंडर रद्द करून अनियमित कारभारालाही चाप लावण्याचा प्रयत्न झाला आहे.

मार्गी लागलेली कामे खालीलप्रमाणे

सुळकुड योजना – 165.70 कोटी, कृष्णा योजना – 28 कोटी, ड्रेनेज लाईन – 18 एमएलडी, अमृत 2 – 560 कोटीचे सहा प्रकल्प, विकासकामासाठी सल्लागार, अनाधिकृत बांधकाम निष्काशीत निविदा, मोठे तळे – 2.86 कोटी, मधुबन गार्डन विकसित, शहापूर खण सुशोभिकरण, जुन्या पुलाशेजारी गार्डन, संकल्पचित्र, रुग्गे मळा भूसंपादन, शुल्क आकारणीत सुसुत्रता, मालमत्तांच्या नोंदी, नविन मिळकतींच्या अद्ययावत नोंदी, इंटरकॉम सेवा, विद्युत पोलना तिरंगा रोषणाई, यांत्रिकी बोट, अग्निशमन वाहन – 52 लाख, मिळकत करभरणा ऑनलाईन, आकृतीबंध मंजूर, थकित पाणीपट्टी वसूल, पदोन्नतीसाठी आढावा कमिटी, भरारी पथकाची रचना, अनुकंपावरील प्रलंबीत नियुक्त्या, अनाधिकृत बांधकामासाठी पतनिर्देश अधिकारी, 1640 दिव्यांगाना लाभ, शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप – 1.51कोटी, डिजीटल शाळा – 1 कोटी, 20 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, सुरक्षारक्षक नियुक्ती, मिळकतवाटप नियमावली, दुकानगाळ्यांचा लिलाव, भाड्यांच्या मळकतींचा सर्व्हे, सहाय्यक अनुदान मागणी, जी.एस.टी.परिपुर्ती प्रस्ताव, वाय वर्गात शहराचा समावेश, बँक खाती वर्गीकरण, कर्मचार्‍यांची देणी भागवली, दुहेरी लेखापरिक्षण पूर्ण, आंबेडकर हॉस्पिटल एक्सरे मशिन

इचलकरंजी शहरासाठी चांगल्या गोष्टी करण्याची नक्कीच इच्छा आहे. मात्र या शहरातील नागरिक व लोकप्रतिनिधींचे तितकेच सहकार्य जर मिळाले तर नक्कीच हे शहर कोल्हापूर आणि सांगली शहराच्या पुढे जावू शकते.

सुधाकर देशमुख, आयुक्त, इचलकरंजी महापालिका

हेही वाचा;

Back to top button