बीड : परतीचा पाऊस आणि घसरलेले दर यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच | पुढारी

बीड : परतीचा पाऊस आणि घसरलेले दर यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच

बीड; पुढारी वृत्तसेवा : शेतकरी आणि संकटाची मालिका एकाच नाण्याच्या दोन बाजू झाले आहेत असं म्हणण्याची वेळ यावर्षी शेतकऱ्यावर आली आहे. जुलै महिन्यापासून सुरू झालेली संकटाची मालिका ही काही संपता संपत नाही. ऑक्टोबर महिना आला तरी पिच्छा सोडायला तयार नाही त्यात कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन आणि शेतमालांच्या घसरलेल्या दराने शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळले जात असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांपुढील संकटाच्या मालिकामुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाण्याची शक्यता जास्त असल्याचे चित्र सध्या गेवराई तालुक्यात पाहण्यास मिळत आहे. दिवसेंदिवस शेतीचे गणित बिकट होत आहे. निसर्गाचा प्रकोप वाढतच आहे आणि वाढत्या महागाईने शेतकरी आता पुरता हातबल झाला आहे. त्यातच शेतीमालाचे दर घसरल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

काही महिन्यापूर्वी 7000 क्विंटल असलेले सोयाबीनचे दर 4400 पर्यंत खाली आहेत. कापसाचे दर ही असंच गडगडले आहेत. यावर्षी 14,000 रुपये क्विंटल दर कापसाला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्षात मात्र कापसाचे दर 5000 ते 8000 रुपये क्विंटल पर्यंत खाली आले आहेत. गेवराई तालुक्यात कापसाच्या शुभारंभला ही चांगले दर मिळेल अशी आशा होती. मात्र यामध्ये पूर्वीच्या दराच्या तुलनेत नेहमी घट नोंदविण्यात आलेली आहे. परतीचा पाऊस यंदा मात्र चांगलाच रडवतोय चांगली रूबाबात डोलत असलेली पिक आता परतीच्या पावसाने गेली आहेत. शेतकऱ्यांचा वाली कोण आता असा प्रश्न शेत करी वर्गाला सतावत आहे.

शेतकऱ्याचे दिवाळे

शेतमालाचे दर पाहून शेतकऱ्यांनी शेतीवर मोठा खर्च केला. खते बियाणे कीटकनाशकाच्या किंमती वाढल्या असतानाही शेतकऱ्यांनी चाल-ढकल केली नाही. सोयाबीनला मिळालेल्या दराने बियाणे कंपन्यांची बॅग दर वाढविली, त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या मजुरी दरावर झाला. सोयाबीनची बॅग काढण्यासाठी अडीच ते तीन हजार रुपयाचा दर आहे. त्यात सोयाबीन किती निघेल याचा मात्र अंदाज नाही.

बोनस दिला तरच शेतकरी तरतील

खर्च आणि नैसर्गिक आपत्ती पाहता कापूस दर कमी झाले त्यामुळे शेतकऱ्यांना बोनस हवा आहे. साखर निर्यातीला सबसिडी मिळते. मात्र सोयाबीन निर्यातीला सरकार सबसिडी देत नाही. कापसाच्या निर्यातीला सबसिडी हवी आहे अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे . विनामूल्य धोरणाचा फटका सोयाबीन आणि आयात धोरण शेतकऱ्यांना मागत पडला आहे महागाई कमी करण्याच्या नावाखाली आयात होत आहे. त्याचा फटका थेट शेतमालावर पडत आहे.

यावर्षी सुरुवातीला पेरणी लायक पाऊस झाला त्यानंतरही पंधरा दिवस पाऊस झाला. परंतु, त्यानंतर पडलेला जवळपास 45 दिवसाचा खंड यामुळे खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले. जमिनीतील जे पीक जिवंत राहिले ते 28 ऑगस्ट नंतर अतिवृष्टी झाली. त्यामुळे गेवराई तालुक्यातील पूर्ण खरीप पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्याचं नगदी पीक असलेले कापूस पिक अतिवृष्टीमुळे बोंड सडली असून कपाशी झाडाला आता पाला सुद्धा राहिलेला नाही.

सोयाबीन मूगही वायाला गेल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी हालाखीचीच आहे. त्यामुळे राज्य सरकारने व विमा कंपनीने पंचनामाचे नाटक न करता. व वेळ न दवडता दीपावली पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात एनडीआरएफच्या निकषानुसार कसे पैसे जातील याची तातडीने काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा गोरगरिबांची दिवाळी ही अंधारातच जाणार आहे. त्यामुळे शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे लवकरात लवकर सरसकट हेक्‍टरची मर्यादा ठेवता सर्व शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये तातडीची मदत द्यावी.

राजेंद्र डाकेपाटील, अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, गेवराई

हेही वाचा; 

Back to top button