कोल्हापूर : लॉ ‘आयपीआर’ पेपर गैरप्रकार; संबंधितांची दुसर्‍यांदा चौकशी | पुढारी

कोल्हापूर : लॉ ‘आयपीआर’ पेपर गैरप्रकार; संबंधितांची दुसर्‍यांदा चौकशी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विधी अभ्यासक्रमातील तृतीय वर्षाच्या ‘इंटिलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटस् लॉ’ (आयपीआर) या विषयाच्या पेपरसंदर्भात सांगलीतील एका कॉलेजमध्ये गैरप्रकार घडल्याच्या संशय होता. शहानिशा करण्यासाठी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, एसआरपीडी समन्वयक आणि संशयित विद्यार्थ्यांची मंगळवारी परीक्षा प्रमाद समितीसमोर दुसरी सुनावणी होऊन चौकशी करण्यात आली.

विधी अभ्यासक्रमातील तृतीय वर्षाच्या ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटस् लॉ (आयपीआर) या विषयाचा 26 ऑगस्ट रोजी होणार्‍या पेपरबद्दल सांगलीतील एका महाविद्यालयात संशयास्पद काही गोष्टी आढळल्या. त्यामुळे संबंधित पेपर रद्द केला होता. परीक्षा प्रमाद समितीने परीक्षेतील गैरप्रकाराच्या संशयावरून संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राचार्य, एसआरपीडी समन्वयक यांची चौकशी सुरू केली आहे. मंगळवारी पुन्हा संबंधितांची चौकशी करण्यात आली. परंतु, काही गोष्टी स्पष्ट झालेल्या नाहीत. या प्रकरणातील दोषींवर विद्यापीठ नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.

Back to top button