कोल्‍हापूर : पारदेवाडीत भाऊबंदकीतून लोखंडी गजाने मारहाण; एकाचा मृत्‍यू | पुढारी

कोल्‍हापूर : पारदेवाडीत भाऊबंदकीतून लोखंडी गजाने मारहाण; एकाचा मृत्‍यू

गारगोटी ; पुढारी वृत्तसेवा : पारदेवाडी येथे शेतीच्या कारणावरून भाऊबंदकीत झालेल्या मारामारीत गंभीर जखमी ज्ञानदेव संतु मोरसे (वय ७१) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत ज्ञानदेव मोरसे यांच्या मुलाने पोलीस स्‍टेशनमध्ये या घटनेची तक्रार दिली. त्‍यावरून ज्ञानदेव बचाराम मोरसे, सुरज मोरसे, संजय मोरसे, कुमार बाळासो मोरसे यांच्यावर भुदरगड पोलीस स्‍टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

मोरसे यांच्या कुटुंबात शेती कसण्याच्या कारणावरून वाद आहे. 18 मे रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ज्ञानदेव संतु मोरसे हे त्यांची पत्नी मुलासह घराच्या दारात उभे होते. यावेळी ज्ञानदेव बचाराम मोरसे, सुरज संजय मोरसे, संजय बचाराम मोरसे, कुमार बाळासो मोरसे यांनी शिवीगाळ करून ज्ञानदेव संतु मोरसे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

ज्ञानदेव बचाराम मोरसे याने लोखंडी गजाने ज्ञानदेव संतु मोरसे यांच्या डोक्यात मारहाण करून त्‍यांना गंभीर जखमी केले. 19 मे रोजी ज्ञानदेव संतु मोरसे यांना उपचाराकरीता सीपीआर येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचलंत का?  

Back to top button