नरेंद्र मोदी सरकारच्या लोकप्रियतेचा आलेख उंचावला : Approval Ratings मध्ये मोठी भर | पुढारी

नरेंद्र मोदी सरकारच्या लोकप्रियतेचा आलेख उंचावला : Approval Ratings मध्ये मोठी भर

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. कोरोनाची साथ सुरू झालेल्या वर्षानंतर या वर्षानंतरचे सर्वात जास्त Approval Ratings मोदी सरकारला २०२२मध्ये मिळाले आहे. Local Circle या संस्थेने ६४००० नागरिकांशी बोलून ही आकडेवारी जाहीर केली आहे.

मोदी सरकारने अपेक्षा पूर्ण केल्या आहेत, किंवा अपेक्षेपेक्षा चांगले काम केले आहे, असे मत यातील ६७ टक्के नागरिकांनी व्यक्त केले आहे. गेल्या वर्षी ही आकडेवारी ५१ टक्के होते. २०२०मध्ये जेव्हा कोरोनाची दुसरी लाट आली होती, तेव्हा हे रेटिंग्ज ६२ टक्के इतके होते.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सरकारने चांगले काम केल्याचे तसेच अर्थव्यवस्था नीट सांभाळल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे; पण ४७ टक्के लोकांनी सरकारने बेरोजगारीची विषय नीट हाताळला नाही, असे ही मत व्यक्त केले आहे. भारतात महागाई वाढत असताना हे रेटिंग्ज आलेले आहेत, हे विशेष. महागाई हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषय आहे. महागाई रोखण्यासाठी सरकारने विविध प्रयत्न केले आहेत. त्यात गहू आणि साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यासारख्या उपाययोजनांचा समावेश आहे.

Approval Ratings : ‘या’ पाहणीतील काही महत्त्वाचे निष्कर्ष असे

1. ७३ टक्के लोकांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भविष्याविषयी केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.
२. भारत सरकारने प्रदूषण नियंत्रणासाठी पुरेसे प्रयत्न केलेले नाहीत, असे ४४ टक्के लोकांना वाटते.
३. ६० टक्के नागरिकांनी सरकारने जातीय सहिष्णुता वाढवली असल्याचे म्हटले आहे, तर ३३ टक्के लोकांनी या विरोधात मत व्यक्त केले आहे.
४. भारतात व्यवसाय करणे सोपे झाल्याचे ५० टक्के लोकांनी म्हटले आहे.

Back to top button