उच्च शिक्षित शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी: आठफुटी पट्ट्यात एकरी 115 टन उसाचे उत्पादन! | पुढारी

उच्च शिक्षित शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी: आठफुटी पट्ट्यात एकरी 115 टन उसाचे उत्पादन!

अनिल तावरे

सांगवी : इंदापूर तालुक्यातील कळस येथील उच्चशिक्षित शेतकर्‍याने आपल्या शेतात आठफुटी पट्ट्यात एकरी 115 टन उसाचे उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी माळेगाव, छत्रपती व अंबालिका कारखान्यांच्या शेतकर्‍यांनी रविवारी 29 मे रोजी कळस येथे जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेऊन संवाद साधला. या यशस्वी प्रयोगामुळे राज्यातील शेतकर्‍यांना नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे.

Rajyasabha Election : गोयल, डॉ. बोंडे, महाडिक यांना भाजपची राज्यसभेची उमेदवारी

कळस येथील वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार विजेते मधुकर आप्पाजी खर्चे यांची दीडशे एकर शेतजमीन आहे. खर्चे यांनी आपल्या हलक्या जमिनीवर 6 फुटी, मध्यम जमिनीवर 7 फुटी व भारी जमिनीत 8 फुटी पट्ट्यात एकरी 104 ते 115 टनांपर्यंत उसाचे उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. या संपूर्ण क्षेत्रावर ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था केली आहे.

50 बाय पाचशे फूट लांबीची भव्य विहीर व कूपनलिकांच्या माध्यमातून ठिबकद्वारे सेंद्रिय, रासायनिक व जैविक एकात्मिक खत व्यवस्थापन केले आहे. विषेश म्हणजे खर्चे यांनी शेतात शेणखत न वापरता जैविक खते व पाचट व्यवस्थापन करीत आहेत. फ्युमिक व क्यूमिक अ‍ॅसिडचा वापर करून उसाचे उत्पादन घेत आहेत. एकदा उसाची लागवड केल्यानंतर सलग पाच वेळा उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला आहे. कमी खर्चात व कमी खतांचा वापर करून दर्जेदार उत्पादन घेण्याचा विक्रम केला आहे. स्वत:चा बेणेमळा व बेणे प्रक्रिया असणे आवश्यक असून आठ फुटी पट्ट्यात एक फूट अंतरावर उसाची लागवड केल्यानंतर एवढे उत्पादन घेणे शक्य असल्याचे मधुकर खर्चे यांनी सांगितले.

कोण आहे नताशा स्टॅनकोविक? जिच्यावर हार्दिक पांड्या झाला लट्टू

शरद पवार यांचे लक्ष

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही हा प्रयोग पाहण्यासाठी येण्याचे ठरले होते. परंतु, काही नियोजित वेळेअभावी त्यांना जमले नाही. परंतु, थोड्याच दिवसांत शरद पवार या उपक्रमशील प्रयोगाची माहिती घेण्यासाठी येणार असल्याचे खर्चे यांनी सांगितले.

Back to top button