कोल्हापुरातील महापूर : जिल्ह्यातील ३७ बंधारे अजून पाण्याखाली | पुढारी

कोल्हापुरातील महापूर : जिल्ह्यातील ३७ बंधारे अजून पाण्याखाली

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा :

कोल्हापुरातील महापूर उतरण्यास सुरुवात झाली असली तरी अजून ३७ बंधारे पाण्याखालीच आहेत. राधानगरी धरणात २३३.२४ दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोल्हापुरातील महापूर ओसरु लागला आहे. पंचंगंगा पाणीपातळी धोक्याच्या खाली आली आहे. पण, असे असले तरी महापूर ओसरण्याचा वेग अजूनही मंदच आहे.

हे बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदी – शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ.

भोगावती नदी- राशिवडे, हळदी, खडक कोगे व सरकारी कोगे.

तुळशी नदी- बीड, आरे व बाचणी.

कासारी नदी- यवलूज, ठाणे-आळवे व पुनाळ-तिरपन.

कुंभी नदी- कळे व वेतवडे.

वारणा नदी- चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी.

कडवी नदी- सरुडपाटणे.

दुधगंगा नदी- सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी व दत्तवाड.

वेदगंगा नदी- कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली असे एकूण ३७ बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठी

तुळशी -89.38  दलघमी, वारणा -887.40, दूधगंगा – 606.84, कासारी- 64, कडवी – 71.24, कुंभी-64.88, पाटगाव- 95.88, चिकोत्रा- 40.60, चित्री – 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला),  जंगमहट्टी -34.02, घटप्रभा –  44.17,  जांबरे- 23.23, आंबेआहोळ – 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी

राजाराम 40.9 फूट, सुर्वे 42.6, रुई 74.6, इचलकरंजी 71.6, तेरवाड 68, शिरोळ 70.4 तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची 70.4 फूट इतकी पाणी पातळी  सध्या आहे.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : डिंपल को सिंपल नही समझने का!

Back to top button