तीन लाखांच्या दारुवर चोरट्यांचा डल्ला; तिसगावमधील घटना, चोरीचा गुन्हा दाखल | पुढारी

तीन लाखांच्या दारुवर चोरट्यांचा डल्ला; तिसगावमधील घटना, चोरीचा गुन्हा दाखल

पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : समर्थ बिअरबार या हॉटेलच्या गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून चोरटयांनी पंधरा हजारांची रोकड व 2 लाख 99 हजारांचे दारूचे बॉक्स, असा तीन लाख तेरा हजार सातशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल चोरला. तिसगाव येथे हा प्रकार घडला. याबाबत पोलिसांनी सुनील अकोलकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तिसगाव येथे भाऊसाहेब लवांडे व सुनील अकोलकर यांचे भागीदारीमध्ये समर्थ बिअरबार हे हॉटेल आहे. तेथे विठ्ठल लवांडे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. गेल्या 8 सप्टेंबर रात्री अकरा वाजता हॉटेल बंद करुन लवांडे घरी गेले होते.

दुसर्‍या दिवशी सकाळी दहा वाजता हॉटेल उघडले असता, हॉटेलच्या गोदामाच्या शटरचे दोन्ही कुलपे तोडली होती. घटनस्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला. एक चोरटा तोंडाला रुमाल बांधून आल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दिसते आहे. मात्र, त्यांनंतर चोरट्याने कॅमेरा तोडून टाकला. शिवाय गोदामात जाताना सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या वीजपुरवठा बंद करून चोरट्यांनी चोरी केली. सुमारे तीन लाख रुपयांची दारु व पंधरा हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरुन नेली.

हेही वाचा

नाशिक : साश्रूनयनांनी जवान विकी चव्हाण यांना अखेरचा निरोप

राहुरी : कर्जाच्या नावाखाली व्यापार्‍याला घातला गंडा; 23 लाखांची फसवणूक, पोलिसात गुन्हा

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना निवडणुकांचे वेध

Back to top button