संगमनेर : बस वाहकावर हल्ला करणार्‍यांना कारावास | पुढारी

संगमनेर : बस वाहकावर हल्ला करणार्‍यांना कारावास

संगमनेर/शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : संगमनेर ते साकुर एसटी बसच्या वाहकावर साकूर फाटा येथे तिकिटाच्या केवळ 2 रुपयांवरून बसच्या चालकावर हल्ला करणार्‍या 3 विद्यार्थ्यांना तब्बल 7 वर्षानंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाल याचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी 3 महिने सश्रम कारावास प्रत्येकी 3 हजार रुपये असा तिघांना मिळून 21 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. संगमनेर आगाराची संगमनेर ते साकुर या बसमध्ये 11 जून 2016 रोजी साकुर येथून दोन जण बसले होते.

बसवाहक श्रीहरी घुमरे यांनी एसटी बसधील सर्व प्रवा शांचे तिकिटे काढले. मात्र एका मुलाने दोन जणांच्या तिकिटाचे 44 रुपये दिले होते. मात्र त्या तिकिटाची रक्कम 46 रुपये होत असल्याचे वाहक श्रीहरी भुमरे यांनी त्या मुलास सांगितले. उरलेले2 रुपये साकुर फाटा येथे उतरताना देतो,असे सांगितले. मात्र बस मधून खाली उतरताना दोन रुपयांवरून त्याने वाहक घूमरे यांच्याशी वाद घातला.

यानंतर त्याच्यासह अन्य दोघांनी वाहक घुमरे यांच्या तोंडावर हातावर छातीवरती लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली होती. तसेच त्यांच्या हातातील तिकीट मशीन खाली पाडून फोडले. त्यानंतर त्या तिघांनी वाहक घुमरे यांच्या हातातील पैसे उधळून दिले. त्यामुळे त्यांचे 893 रुपये गहाळ झाले होते. याबाबत बसवाहक किसन घुमरे यांनी घारगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील तिघांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

याबाबत संगमनेर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर तब्बल सात वर्षा नंतर या खटल्याची सुनावणी झाली. यावेळी सरकार पक्षाच्यावतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी चार साक्षीदारांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. तसेच या खटल्यात फिर्यादी वाहक आणि तपासी अंमलदार (घारगाव पोलिस ठाणे) यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी प्रबळ युक्तिवाद केला. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मना ठकर यांनी सोमेश उर्फ सोमनाथ बोंबले, शुभम सुखदेव बोंबले आणि शुभम पांडु रंग गुंजाळ यांना दोषी धरून तीन महिने सक्षम कारावास व प्रत्येकी 7 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच फिर्यादीस प्रत्येकी 1 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.
यावेळी सरकारी वकील कोल्हे यांना पैरवी अधिकारी म्हणून पो. कॉ. प्रवीण डावरे, पोलिस हे. कॉ. रामभाऊ भुतांबरे व महिला पो. कॉ. दिपाली दवंगे, प्रतिभा थोरात, स्वाती नाईकवाडी, नयना पंडित यांनी सहकार्य केले.

हेही वाचा

मराठा मंत्री, आमदार, खासदारांनी राजीनामे द्यावेत ; मराठा समाज आंदोलकांची संतप्त प्रतिक्रिया

श्रीरामपूर : पाण्याअभावी रब्बीचे संकटही शेतकर्‍यांच्या माथी !

फोडाफोडीचे सरकार पुन्हा दिसणार नाही : आ. बाळासाहेब थोरात

Back to top button