Ahmednagar crime : सशस्त्र दरोड्याचा 24 तासांत छडा; महिलेसह तिघांना अटक | पुढारी

Ahmednagar crime : सशस्त्र दरोड्याचा 24 तासांत छडा; महिलेसह तिघांना अटक

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने अरणगाव (ता. नगर) येथे सहा जणांनी मिळून एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत लुटल्याची घटना घडली होती. नगर तालुका पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासांत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. एलसीबीच्या पथकाने एका महिलेसह तिघांना बुरुडगावातील तांबे मळ्याजवळील रेल्वे पुलाखालून अटक केली.

विजय जालिंदर चव्हाण, पाणकोर जालिंदर चव्हाण (दोघे रा.तांबेमळा, नगर), विजय गजाजन काळे (रा. दहिगाव साकत, नगर) या तिघांना एक लाख 64 हजार रुपये किमतीच्या चोरीतील मुद्देमालासह नगर तालुका पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. दगू बडोद भोसले (रा.वाळकी, ता.नगर), मितवान ज्ञानदेव चव्हाण (रा.बुरुडगाव, नगर), अजय गजानन काळे (रा.दहिगाव, ता.नगर) हे तिघे पसार झाले आहेत. अरणगाव शिवारातील रेल्वे टॅ्रकजवळ आरोपींनी भरत चयन नरवडे (रा. धनगर पिंप्री, ता.अंबड, जि. जालना) यांना स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने बोलावून घेतले होते.

सहा जणांनी नरवडे यांना मारहाण करीत त्यांच्याकडील 60 हजार 400 रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होते. दरम्यान, हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी विजय गजाजन काळे याने केल्याची माहिती एलसीबीचे प्रमुख दिनेश आहेर यांना मिळाली. त्याआधारे एलसीबीच्या पथकाने तीन आरोपींना बुरूडगाव भागातून अटक केली. आरोपी विजय काळे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सोनई व नगर तालुका पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिस निरीक्षक आहेर, सहायक निरीक्षक हेमंत थोरात, हवालदार बबन मखरे, संदीप पवार, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले, रवींद्र कर्डिले, मेघराज कोल्हे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, संतोष लोढे, विशाल दळवी, सोनाली साठे, रवींद्र घुंगासे, मच्छिंद्र बर्डे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळू खेडकर, अमृत आढाव, अरुण मोरे यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा

Pune Metro Update : मेट्रोचे ब्रेक लावल्यावर होणार वीजनिर्मिती; पुण्यातील ‘या’ मार्गावर अत्याधुनिक ब्रेकिंग सिस्टिम’चा वापर

नाशिक : नागाच्या दंशाने मुलीचा मृत्यू, चांदवड परिसरातील घटना

Pravin Tarde : ‘फकिरा’ कादंबरीवर चित्रपट करणार; दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची माहिती

Back to top button