पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज (दि.७) १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९३ जागांसाठी सकाळी ७ वाजतापासून मतदान सुरू झाले आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यातील मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत बारामती मतदारसंघात सर्वात कमी तर १४.६४ टक्के, तर कोल्हापूर मतदारसंघात सर्वाधिक २३.७७ टक्के मतदान झाले आहे.
महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात आज मतदानाची प्रक्रिया उत्सात सुरूवात झाली. यामध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत कोल्हापूर, बारामती मतदारसंघासह लातूर – २०.७४ टक्के, सांगली – १६.६१टक्के, हातकणंगले – २०.७४ टक्के, माढा – १५ .११ टक्के, उस्मानाबाद -१७.०६ टक्के, रायगड – १७.१८ टक्के, रत्नागिरी -सिंधुदूर्ग-२१.१९ टक्के, सातारा -१८.९४ टक्के आणि सोलापूर -१५.६९ टक्के मतदान झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज (दि.७) १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९३ जागांसाठी मतदान सुरू झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्य तिसऱ्या टप्प्यात आसाम, बिहार, छत्तीसगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यात आज मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात सकाळी ९ पर्यंत १०.५७ टक्के मतदान झाले होते, तर त्यानंतरच्या टप्प्यात ११ वाजेपर्यंत २५. ४१ टक्के मतदान झाले.