मोबाईलवर बोलला… अन् आरोपी अडकला जाळ्यात! | पुढारी

मोबाईलवर बोलला... अन् आरोपी अडकला जाळ्यात!

अमोल गव्हाणे

श्रीगोंदा(अहमदनगर) : हॅलो..ऽऽ. ‘मी आमूक आमूक कंपनीतून बोलतोय तुम्हाला आमच्या कंपनीकडून एक बक्षिस आलंय…’ तुम्हाला कुठे देऊ.. असे म्हणताच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आडकला. तब्बल दीड महिना चकवा देणार्‍या आरोपीस श्रीगोंदा पोलिसांनी आशी नामी शक्कल लडवून जेरबंद केले आहे.

आजच्या गतिमान जगात गुन्हेगार पकडणे जिकरीचे झाले असून, आरोपी पोलिसांच्या दोन हात पुढे असल्याचे एकीकडे बोलले जाते. यामुळेच तर आरोपी पकडताना पोलिसांच्या नाकीनऊ येते. आरोपी पकडले जावेत म्हणून अनेक आंदोलने, मोर्चे निघतात. गुन्हेगार पोलिस यंत्रणेस चकवा देण्यात माहीर असल्याने अनेक गुन्ह्यांची उकल होतना दिसत नाही. मात्र, पोलिसांनी निश्चय केला तर आरोपीला पकडणे अवघड नसते.

असाचा अनुभव श्रीगोंदा पोलिसांना आला आहे. दीड महिन्यांपूर्वी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला. गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने श्रीगोंदा गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक आरोपींच्या शोधात होते. अनेक प्रयत्न करूनही या गुन्ह्यातील आरोपी मिळत नव्हता. या गुन्ह्यात महत्वाची भूमिका असणारा एक आरोपी इनामगाव येथे असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग यांना मिळाली होती. लागलीच पोलिस पथक इनामगावमध्ये दाखल झाले.

पोलिस पथकाकडे आरोपीचा डोक्यावर फेटा असलेला फोटो होता. त्या आधारे आरोपीचा परिसरात शोध घेण्यात आला. मात्र, आरोपी काही केल्या मिळत नव्हता. खबर पक्की असल्याने पोलिस जिकिरीच्या प्रयत्नात होते; मात्र आरोपी पकडण्यात यश येत नव्हते. तब्बल दीड महिना पोलिसांना चकवा देणारा आरोपी पोलिसांच्या नामी शक्कल लढवताच मिळून आला आणि त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांनी लढविली नामी शक्कल!

पोलिस उपनिरीक्षक अभंग यांनी एक नामी शक्कल लढवली. संबधीत आरोपीस भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. ‘हॅलो..ऽऽ.. मी आमूक आमूक कंपनीतून बोलतोय…‘तुम्हाला आमच्या कंपनीकडून बक्षिस लागले आहे, तुम्ही आता कुठे आहात. समोरून आरोपी, ‘मी कारेगावला आहे.., पोलिस..मग हे बक्षिस कुठे द्यायचे.., मग आरोपी फोनवर बोलतच एका हॉटेलमधून बाहेर आला. फोनवर बोलत असणारा व्यक्तीच आरोपी असल्याची खात्री होताच पोलिस उपनिरीक्षक अभंग त्याच्या बाजूला जाऊन उभा राहिले. परंतु, त्याचवेळी आरोपीने ‘साहेब, माझे कार्ड तर या कंपीनीचे आहे…मग मला दुसर्‍या कंपनीकडून कसे काय बक्षिस लागले?, असे विचारतच तत्काळ पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

हेही वाचा

एटीएसने रत्नागिरीतून एकाला उचलले ; दोन्ही दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याचा आरोप

अहमदनगर : वाहनांच्या काळ्या काचा; 115 वाहनांवर कारवाई

अहमदनगर : उड्डाणपुलाखालील रस्त्यावर चिखल, मातीमुळे अपघात

Back to top button