एटीएसने रत्नागिरीतून एकाला उचलले ; दोन्ही दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याचा आरोप

एटीएसने रत्नागिरीतून एकाला उचलले ; दोन्ही दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याचा आरोप
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य दहशतवाद विरोधी पथकाने रत्नागिरी जिल्ह्यातून एकाला अटक केली. कोथरूड पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यापूर्वी या दोन्ही दहशतवाद्यांना कोंढव्यात निवासस्थान मिळवून दिल्याच्या आरोपावरून आणि दोन्ही दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी अब्दुल कादीर दस्तगीर पठाण याला अटक केल्यानंतर आता आणखी एकाला रत्नागिरीतून एटीएसच्या पथकाने अटक केली आहे.

त्याच्यावर या दोन्ही दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे. आतापर्यंत एटीएसने दोन दहशतवादी आणि त्यांच्या इतर दोन साथीदारांना अटक केली आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडून इतर राज्यात देखील या दोन्ही दहशतवाद्यांच्या अनुषंगाने तपास केला जातोय.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news