भिंगारमध्ये कपडा मार्केटला आग; १५ दुकाने खाक | पुढारी

भिंगारमध्ये कपडा मार्केटला आग; १५ दुकाने खाक

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा: अहमदनगर येथील भिंगारमधील कपडा मार्केटला आग लागली. ही दुर्घटना सदर बाजार लगतच्या कपडा मार्केटमध्‍ये शुक्रवारी (दि.८) रोजी मध्यरात्री घडली. या आगीत कपडा मार्केटमधील असणारी १५ दुकाने जळून खाक झाली आहेत.

अहमदनगर महापालिका, एमआयडीसी, राहुरी, व्हीआरडी येथील अग्निशमन दलाच्या पथकांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर आज शनिवारी पहाटे ५ वाजता आग आटोक्यात आली.

या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र, मोठी वित्तहानी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच भिंगार पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. येथील परिसरातील नागरिकांना घराबाहेर काढून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

पाहा व्हिडिओ : मुलगी क्रिकेट खेळणार म्हणून चिडवले : पण उंचावले तिने नाव कोल्हापूरचे | महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत

Back to top button