Aryan Khan case : आर्यनला ‘एनसीबी’ अधिकारी घेऊन जाताना पाहून गौरी खानला अश्रू अनावर | पुढारी

Aryan Khan case : आर्यनला 'एनसीबी' अधिकारी घेऊन जाताना पाहून गौरी खानला अश्रू अनावर

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

क्रुझ शिपवरील ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा (Aryan Khan case) जामीन अर्ज मुंबई कोर्टाने फेटाळला. कोर्टाने Aryan Khan ला पुढील १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एनसीबीचे अधिकारी आर्यनला कोर्टातील माडीवरून खाली घेऊन येतात पाहून (Aryan Khan case) गौरी खानला अश्रू अनावर झाले. गाडीमध्ये गौरी खान डोक्याला हात लावून चिंतेत बसलेली दिसली. हा प्रसंग माध्यमांनी कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

विशेष म्हणजे, आर्यनच्या आई गौरी खानचा ८ ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. त्याचदिवशी आर्यनच्‍या त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होती. आपला लेक घरी परत यावा म्हणून तिने खूप प्रयत्न केला. कोर्टाने आर्यन खानसह त्याच्या मित्रांचा जामीन अर्ज फेटाळला.

आर्यन खान त्याच्या जामीन अर्ज फेटाळल्‍यानंतरचा  एक व्हिडिओ समोर आलाय. जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर एनसीबीचे अधिकारी आर्यनला कोर्टातील माडीवरून खाली घेऊन येतात. यावेळी परिसरात आणखी एक कार समोर उभी आहे. त्यात गौरी खान बसलेली दिसते. ती कपाळावर हात ठेऊन खाली मान घालून गाडीत बसलेली या व्हिडिओमध्‍ये दिसत आहे.

gouri khan
gouri khan

आयर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला

दरम्यान, आर्यन खान याच्यासह आठ आरोपींना राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) गुरुवारी दि. ८ रोजी दुपारी न्यायालयासमोर हजर केले. दोन्ही पक्षांमध्ये ३ तासांहून अधिक काळ  युक्तिवाद झाला. न्यायालयाने आठही आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले हाेते.

ड्रग्ज पार्टीत आर्यन खानला अटक

एनसीबीच्या पथकाने २ ऑक्टोबरच्या रात्री कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी केली होती. त्यावेळी आर्यन खान याच्यासह त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमिचा, नुपूर सारिका, इश्मित सिंग, यांना ताब्यात घेतले होते. तसेच मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा अशा आठ जणांना काही प्रमाणातील ड्रग्ज आणि रोख रकमेसह ताब्यात घेत चौकशी सुरू केली. एनसीबीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ३ ऑक्टोबरच्या दुपारी आर्यन याच्यासह अरबाज आणि मुनमुन हिला अटक केलीय.

हेही वाचलं का ?

Back to top button