नगर : सावेडी नाक्यावर एकाला बेदम मारहाण | पुढारी

नगर : सावेडी नाक्यावर एकाला बेदम मारहाण

नगर; पुढारी वृत्तसेवा : सावेडी नाक्यावर एकाला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याबाबत गोविंद अशोक कुभकर्ण (रा.पांढरीचा पूल, ता.नेवासा) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैभव भालेराव (रा.खोसपूरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गोविंद कुभकर्ण हे शुक्रवारी (दि.24) त्यांच्या चारचाकी वाहनाचे टायर बदलण्यासाठी नगरमध्ये आले होते. सावेडी नाक्यावर कुभकर्ण यांना ओळखीतील वैभव भालेराव भेटला असता त्याने गाडीतून बाहेर ओढले. ‘तू आमच्या गावातील महिलांना लेबर कामासाठी घेऊन जातो व त्यांना त्रास देतो’, असे म्हणत त्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. खोसपूरी येथे आला तर जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button