RCB vs CSK : बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात चेन्नई नाणेफेक जिंकली; प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय | पुढारी

RCB vs CSK : बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात चेन्नई नाणेफेक जिंकली; प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज आयपीएल 2024 हंगामातील महत्वाचा साखळी सामना बंगळुरू आणि चेन्नई यांच्यात होत आहे. या सामन्याच्या निकालातून यंदाच्या हंगामातील प्ले ऑफचे चित्र स्पष्ट होणार आहे. याआधी कोलकाता, राजस्थान आणि हैदराबाद यांनी आपले प्ले ऑफमधील तिकीट कन्फर्म केले आहे. सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. (RCB vs CSK)

चेन्नईच्या संघात एक बदल

प्ले ऑफसाठी महत्वाच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने आपल्या संघात एक बदल केला आहे. चेन्नईने मोईन अलीच्या जागी मिचेल सँटनरला संघात स्थान दिले आहे. तर आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस म्हणाला सामन्यासाठी बंगळुरूने कोणताही बदल केलेला नाही.

दोन्ही संघांचे प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज.

इम्पॅक्ट प्लेयर : स्वप्नील सिंग, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार विशाक, हिमांशू शर्मा

चेन्नई सुपर किंग्ज : रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महिष थेक्षाना.

इम्पॅक्ट प्लेयर : शिवम दुबे, समीर रिझवी, प्रशांत सोळंकी, शेख रशीद, मुकेश चौधरी.

बंगळुरूमध्ये पावसाची 50 टक्के शक्यता

बंगळुरूमध्ये सकाळी हवामान आल्हाददायक होते. दिवसा सूर्यप्रकाश अपेक्षित होता. संध्याकाळी वातावरण ढगाळ होण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान बेंगळुरूमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, शनिवारी संध्याकाळी पावसाची 50 टक्के शक्यता आहे.

काय आहे हवामान खात्याचा अंदाज?

भारतीय हवामान खात्याने 18 मे रोजी मध्य बेंगळुरू परिसरात ताशी 40-50 किमी वेगाने वारे, वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून बेंगळुरूमध्ये सतत पाऊस पडत आहे, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, CSK आणि RCB यांच्यातील सामन्यादरम्यान पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. हसामना सुरू होण्याच्या वेळी म्हणजे संध्याकाळी 7.30 वाजता आकाश ढगांनी झाकले जाण्याची शक्यता आहे. मात्र, चिन्नास्वामी स्टेडियममधील पावसाचे पाणी निचरा हाेण्‍याची व्यवस्था चांगली असल्याने पाऊस थांबल्यानंतर अर्ध्या तासात खेळ सुरू होऊ शकतो, ही दिलासादायक बाब आहे.

यंदाच्या मोसमात दोन सामन्यात पावसाची फटकेबाजी

यंदाच्या मोसमात सामन्यात पाऊस येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी हंगामात दोन सामने पावसामुळे वाहून गेले होते, तर एका सामन्यात पावसामुळे षटके कमी करण्यात आली होती.  मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यातील सामना पावसामुळे 16-16 षटकांचा करण्यात आला होता, तर 13 मे रोजी होणारा कोलकाता आणि गुजरातमधील सामना रद्द करण्यात आला होता. कर हैदराबाद आणि गुजरात यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला होता. अशा परिस्थितीत IPL 2024 चा सर्वात मोठा सामना पावसामुळे गमवावा असे चाहत्यांना वाटत नाही.

सामना वाहून गेल्यास आरसीबीचे नुकसान

चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील सामन्यात पाऊस पडला आणि कटऑफ वेळेपर्यंत सामना सुरू होऊ शकला नाही, तर आरसीबीला नुकसान सहन करावे लागेल आणि सीएसके संघाला प्लेऑफचे तिकीट मिळेल. CSK संघ सध्या 13 सामन्यांत सात विजय आणि सहा पराभवांसह 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर बेंगळुरू संघ 13 सामन्यांत सहा विजय आणि सात पराभवांसह 12 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. सामना रद्द झाल्यास, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल, अशा परिस्थितीत CSK 15 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ बनेल, तर RCB 13 गुणांसह शर्यतीतून बाहेर पडेल.

Back to top button