नगर : ड्रीम सिटीवासियांचा पाणीपुरवठा तोडला; आ. संग्राम जगतापांची नागरिकांनी घेतली भेट | पुढारी

नगर : ड्रीम सिटीवासियांचा पाणीपुरवठा तोडला; आ. संग्राम जगतापांची नागरिकांनी घेतली भेट

नगर; पुढारी वृत्तसेवा : मनपा प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न देता नगर-कल्याण रोडवरील ड्रीम सिटी प्रकल्पाचा पाणीपुरवठा बंद केल्याच्या निषेधार्थ काल ड्रीम सिटीमधील नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन निवेदन देऊन लक्ष वेधले. आ. जगताप यांनी या प्रश्नात लक्ष घालून हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

नगर-कल्याण महामार्गावर महावीर होम्स ड्रीम सिटी म्हणून प्रकल्प असून, या प्रकल्पातील 250 फ्लॅटमधील 1500 नागरिकांनी आमदार जगताप यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ड्रीम सिटी मधील 280 फ्लॅटधारकांनौ दररोज होणारा पाणीपुरवठा मनपा प्रशासनाने बंद केला असून, चार दिवसातून एकदाच पाणी देणार, असे अधिकार्यांनी सांगितले असून, 15 दिवसापासून पाणी एकदाही आले नाही.

ड्रीम सिटीमध्ये मनपा प्रशासनाने अधिकृत नळ कलेक्शन दिले असून, आम्ही मनपाची पाणीपट्टी व घरपट्टी भरत आहोत. ड्रीम सिटी मध्ये पाण्याचे कनेक्शन दिले पाणीपुरवठा सुरळीतपणे होत नाही. वास्तविक केडगावला जाणार्‍या पाईपलाईन वर अनेक अनाधिकृत कनेक्शन असून, त्याबद्दल मनपा प्रशासन कोणतेही लक्ष देत नाही. ड्रीम सिटीला पाणीपुरवठा केला. त्यामुळे कोणताही फरक पडला नसताना केवळ राजकीयदृष्ट्या ड्रीम सिटी मधील पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न होत आहे.

Back to top button