अहमदनगर : तीन वर्षीय मुलीचे अपहरण, आरोपी अटकेत | पुढारी

अहमदनगर : तीन वर्षीय मुलीचे अपहरण, आरोपी अटकेत

अहमदनगर, पुढारी वृत्तसेवा : तीन वर्षीय मुलीच्या अपहरणाची घटना मेहकरी (ता. नगर) येथे रविवारी (ता. 13) सकाळी घडली. नगर तालुका पोलिसांनी तत्परतेने या अपहरणाचा शोध घेऊन आरोपी सागर सुरे (रा. औरंगाबाद) याच्या ताब्यातून मुलीची सुटका केली आहे. आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक मारग यांनी दिली.

मेहकरी गावातील एका गरीब कुटुंबात तीन वर्षाच्या मुलीचे  सागर सुरे याने  पालकांची नजर चुकवून अपहरण केले. मुलगी गायब झाल्यावर पालकांनी पोलिसांशी संपर्क साधला. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने या मुलीचा शोध घेतला.

या मुलीला आरोपीच्या ताब्यातून हस्तगत करून तिच्या पालकांकडे सोपविण्यात आले आहे. आरोपी हा दारूच्या नशेत आढळून आला आहे. त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याची शक्‍यता आहे. त्याच्यावर अपहरण आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षक कायदा (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button