India vs Sri Lanka : ऋषभ पंतच्या नावावर ‘या’ विक्रमाची नोंद

च्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद
च्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डिस्क :  बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि श्रीलंकामध्‍ये दुसर्‍या कसोटी सामन्‍यातील दुसर्‍या दिवशी भारताची दमदार सुरुवात झाली. ऋषभ पंतने २८ चेंडूमध्ये अर्धशतक झळकवत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऋषभ पंत हा कसाेटीमध्‍ये सर्वात जलद गतीने अर्धशतक झळकावणारा भारतीय खेळाडू बनला आहे.

ऋषभ पंतच्या या खेळीने भारताने ३४२ धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. याशिवाय ऋषभ पंत  दोन्ही डावांमध्ये १५० च्या सरासरीने ३० पेक्षा अधिक धाव करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. ऋषभ पंत हे सातत्य कायम दिसत आहे. विदेशी खेळपट्ट्यावरतीही त्याने चांगली कामगिरी केली आहे.

यापुर्वी २००५ मध्ये भारताविरूद्ध खेळताना शाहिद आफ्रिदीने २६ चेंडूमध्ये आपले अर्धशतक केले होते. तर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू इयॉन बोथम याने भारताविरूद्धच खेळत असताना २८ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. भारताचा जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूर याने २०२१च्या ओवल कसोटीमध्ये ३१ चेंडूमध्ये ५० धावा पूर्ण केल्या होत्या. कसाेटी क्रिकेटमध्‍ये भारताकडून सर्वात जलदगतीने अर्धशतक करण्‍याचा विक्रम ऋषभ पंतच्‍या नावावर नाेंदला गेला आहे.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news