ख्रिस्तियानो रोनाल्डो : 49 वी हॅट्ट्रिकसह सर्वाधिक गोल करणारा खेळाडू | पुढारी

ख्रिस्तियानो रोनाल्डो : 49 वी हॅट्ट्रिकसह सर्वाधिक गोल करणारा खेळाडू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू बनला आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आता रोनाल्डोच्या नावावर जमा झाला आहे. रोनाल्डने आतापर्यंत एकूण 806 गोल केले आहेत. महान फुटबॉलपटू जोसेफ बाईकनचा फुटबॉल इतिहासात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम रोनाल्डोने मोडला. रोनाल्डोने आपल्या 806 व्या गोलसह हा विक्रम मोडला.

रोनाल्डोने गेल्या वर्षी जानेवारीत पेलेंचा विक्रम मोडीत काढला होता. त्यावेळी पेलेंच्या अधिकृत खात्यावर 757 गोल दिसत होते. रोनाल्डोने पेलेंना मागे टाकताच त्यामध्ये बदल झाले. त्यांची गोल संख्या 767 झाली. या कामगिरीबद्दल ब्राझीलचे स्टार फुटबॉलपटू पेले यांनी रोनाल्डोचे अभिनंदन केले होते.

दरम्यान, रोनाल्डोची क्लब कारकिर्दीतील ही 49 वी हॅट्ट्रिक होती. प्रीमियर लीगच्या इतिहासात हॅट्ट्रिक करणारा रोनाल्डो हा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. जेथे टेडी शेरिंगहॅमने ऑगस्ट 2003 मध्ये वयाच्या 37 वर्षे आणि 146 दिवसांत हॅट्ट्रिक केली होती.

ख्रिस्तियानो रोनाल्डो हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. त्याने गेल्या वर्षी इराणच्या अली दारला हरवून हा विक्रम केला होता. अलीने 109 गोल केले होते. आतापर्यंत रोनाल्डोने पोर्तुगालसाठी 115 गोल केले आहेत.

Back to top button