Sanjay Raut Tweet : संजय राऊत यांच्या ‘मंत्रीमंडळा’वरील ‘त्या’ ट्विटची जोरदार चर्चा | पुढारी

Sanjay Raut Tweet : संजय राऊत यांच्या 'मंत्रीमंडळा'वरील 'त्या' ट्विटची जोरदार चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात पूर्णपणे मंत्रीमंडळ स्थापन केलं जावं आणि मगच सर्व निर्णय घेतले जावेत, असा सूर विरोधी पक्षांमधून उमटत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे देखील या राजकीय परिस्थितीवर मत व्यक्त करताना दिसून येत आहेत. महाराष्ट्रातील नव्याने स्थापन झालेल्या मंत्रीमंडळाची काय स्थिती आहे, या विषयीचे त्यांनी एक ट्विट केले असून याची जाेरदार चर्चा राजकीय वर्तुळात हाेत आहे. (Sanjay Raut Tweet)

काय आहे संजय राऊत यांचे चर्चेतील ट्विट ?

खासदार संजय राऊत यांनी  ट्विटमध्‍ये म्‍हटलं आहे की, भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1A नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले दाेन आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही माननीय राज्यपाल महोदय, काय चालले आहे हे? असं सवाल करत सत्ताधारी गटाला त्यांनी धारेवर धरले आहे.

हेही वाचा

Back to top button