बहुआयामी शिक्षण घ्या : दीपक शिकारपूर | पुढारी

बहुआयामी शिक्षण घ्या : दीपक शिकारपूर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बहुआयामी शिक्षण : उद्योग क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. डिजिटल उपकरणे येत आहेत.

पूर्वी वॉकमन, रेडिओ होता. आधी घरोघरी मातीच्या चुली… अशी म्हण होती. आता घरोघरी संगणकच्या चुली असे म्हणावे लागते आहे.

आयटीत घडायचे असेल तर शाखा कोणती यावर लक्ष केंद्रित न करता बहुआयामी ज्ञान संपादन करण्याचा काळ आहे.

त्यासाठी आयुष्यभर विद्यार्थी राहणे आवश्यक आहे.

बहुआयामी शिक्षण : आता ज्ञान कौशल्य आणि वागणूक हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे मत आयटीतज्ज्ञ तथा उद्योजक दीपक शिकारपूर यांनी व्यक्‍त केले.

दैनिक ‘पुढारी’च्या वतीने आयोजित एज्युदिशा या ऑनलाईन वेबिनारच्या दुपारच्या सत्रात ते बोलत होते.

ते म्हणाले की, ज्ञान आणि माहिती यात बरेच अंतर आहे.

बहुआयामी शिक्षण : उदा. टोमॅटो तुम्ही गुगल सर्च केलं तर टोमॅटोची खूप माहिती येईल.मात्र, त्याचे सॉस तयार करणे याला कौशल्य म्हणतात.

महाविद्यालयातून थोडा वेळ काढून इंटरशिपसाठी कंपनीत जरूर जा.

त्यामुळे तुमचा बौद्धिक आयाम बर्‍याच प्रमाणात बदलेल. या जगात सॉफ्ट स्किलला फार महत्त्व आले आहे.

सत्तर टक्के विद्यार्थी बोलण्यात कमी पडतात, त्यासाठी संभाषण चातुर्य आलं पाहिजे.

महानायक अमिताभ बच्चन यांचे उदाहरण आपण ऐकलं असेल, त्यांची उंची खूप जास्त असल्यामुळे त्यांना बोलताना अवघड जायचं.

नी आरशासमोर मोठ्याने बोलायला सुरुवात केली आणि ते सुपरस्टार झाले.

असाच आत्मविश्वास आपल्याला आला की, मग आपण जग पादाक्रांत करू शकतो.

विदेशी भाषाही आपल्याला यायला हव्यात. त्यात जपानी भाषा जरूर शिका. तेथे आजही अडीच लाख रोजगार आहेत.

सुमारे अडीच लाख नोकर्‍या अगदी सहज उपलब्ध आहेत.

संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध होत आहे. त्यातून फार मोठी जॉब निर्मितीही होत आहे.

ज्यांना गणित येते; त्यांनी मशीन लर्निंग हा विषय घ्यायला हरकत नाही.

उद्याचे जग याच विषयाचे आहे. जी-मेलवर तुम्ही एक शब्द टाइप केला तर त्याच्या पुढचा शब्द तुम्हाला येतो.

तसेच तंत्रज्ञान आता विकसित होत आहे.

रोबोटिक्स ही नवीन ब्रँच आता विकसित होत आहे. सरकारने इ- वाहन विक्रीवर प्रचंड भर दिला आहे. 2034 पर्यंत पूर्ण जगात 30 टक्के इ- वाहने राहतील.

आता मेकॅट्रॉनिक्स ही नवीन ब्रँच तयार होत आहे. चार्जिंग स्टेशन, मेंटेनन्स, बॅटरी ही नवी उत्पादने आता तयार होत आहेत.

या क्षेत्रातही खूप नवीन नवीन नोकर्‍या, उद्योग निर्मितीला वाव आहे.

अनेक हॉस्पिटल आता छोट्या छोट्या कामासाठी रोबोटिक नर्सेस ठेवत आहेत.

औषध घ्यायचे असेल तर आता रोबोट येऊन औषध देतो.

आपला एक गैरसमज आहे की, रोबोटिक तंत्रज्ञानाने बेकारी वाढत आहे: पण तसे नाही.

या विषयाला निगेटिव्ह न घेता पॉझिटिव्ह घेतले तर आपल्याला नवे रोजगार उपलब्ध होऊ शकतात.

त्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान शिकणे गरजेचे आहे.

ऑटोमेशन झाले म्हणजे माणसांची गरज संपली, असे होत नाही. हे तंत्रज्ञान शिकले तर तुम्ही रोबोट चालवू शकता.

जर तुम्ही पदवीधर असाल तर एक्स्ट्रा सर्टिफिकेशनच्या मागे लागा.

आता भाषांतर करणारे रोबोट तयार होत आहेत. सध्या जपानमध्ये ऑलिम्पिक सुरू आहे.

त्यांनी त्यासाठी एक लाख रोबोट तयार केले होते.

मात्र, ऑलिम्पिक हे लोकांविना झाल्याने त्यांना ते रोबोट तसेच ठेवावे लागले.

नाहीतर या रोबोटकडून आपल्याला व जगाला बरेच काही शिकायला मिळाले असते.

आता एक ब्रँच एक शाखा यावर भर देऊ नका. क्रॉस शाखेचा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे, मल्टिटास्किंग राहता आले पाहिजे.

दुसर्‍या कोणत्याही शाखेचे ज्ञान घेता आले पाहिजे, तरच तुम्ही स्पर्धेत राहाल.

डेटा सिक्युरिटी हा नवीन आणखी एक रोजगाराचा प्रकार आहे. सायबर गुन्हे शोधण्यासाठी त्याचा उपयोग करतात.

यात सरकारी क्षेत्रासह पोलिस दलातही नोकरी मिळू शकते व चांगले करिअर करता येते.

नेटवर्किंग हे आणखी एक नवीन दालन विद्यार्थ्यांना खुले झाले आहे. हार्डवेअर मेंटेनन्समध्ये तर भरपूर जॉब आणि उद्योग आहेत.

आजचे तंत्रज्ञान उद्या लागू होत नाही, त्यामुळे जॉब किंवा उद्योग निवडताना अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित ते निवडले पाहिजे.

जावा प्रोग्रामला खूप मागणी होती, मात्र आता ते मागे पडून नवी टेक्नॉलॉजी आली आहे.

मोठी स्वप्नं बघा….

उबेर ही भारतातील वाहतूक क्षेत्रातील नंबर एक कंपनी झाली आहे.

याची जाहिरात आपण टीव्हीवर पाहतो, त्यांनीदेखील अ‍ॅप्सचा वापर करून फार मोठे मार्केट काबीज केले आहे.

मोठी स्वप्नं बघा, नोकरीची मानसिकता ठेवू नका. शंकर महादेवन मुंबईत एका मुलाखतीसाठी गेले असता तिथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमच्या हस्ते होता.

त्यावेळी निवडक चार विद्यार्थ्यांपैकी फक्‍त एकाने वेगळे उत्तर दिले.

उत्तर देणारा विद्यार्थी म्हणजे शंकर महादेवन होता. आयटीमध्ये उज्ज्वल भविष्य असतानादेखील त्यांनी संगीत क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग त्यांनी संगीत क्षेत्रात वापरून डिजिटल आर्टचे नवे पर्व उदयास आणले.

Back to top button