tokyo olympic medal : ऑलिम्पिक पदकवीरांवर बक्षिसांची लयलूट; राज्यांपासून उद्योगपतींपर्यंत हात सरसावले | पुढारी

tokyo olympic medal : ऑलिम्पिक पदकवीरांवर बक्षिसांची लयलूट; राज्यांपासून उद्योगपतींपर्यंत हात सरसावले

पुढारी ऑनलाईन डेस्क : टोकियो ऑलिम्पिकमध्ये (tokyo olympic medal) भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचे देशभरातून मोठे कौतुक होत आहे. भारतात पहिल्यांदाच ॲथलेटमध्ये निरज चोप्राने सुवर्णपदक मिळवून दिले. नीरज पाठोपाठ भारतासाठी दोन सिल्वर आणि चार कांस्य पदके मिळवली आहेत. या सर्व खेळाडूंवर बक्षिसांची बरसात होत आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ६ कोटी तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी नीरजला २ कोटींचे रोख बक्षीस जाहीर केले. याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये (tokyo olympic medal) पदक मिळवलेल्या इतर खेळाडूंसाठीही बक्षिसांची घोषणा करण्यात आली. महिंद्रा ग्रुपचे मालक आनंद महिंद्रा यांनी निरजला एसयूव्ही गाडी भेट देण्याची घोषणा केली.

यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलालखट्टर म्हणाले की, नीरजला पंचकुलामध्ये स्थापन करण्यात येणाऱ्या ॲथलेटिक्स केंद्राचा मुख्य केलं जाईल जर त्याची इच्छा असेल. आमच्या क्रीडा धोरणांतर्गत, हरियाणा सरकारकडून नीरजला ६ कोटी रुपयांचे रोख बक्षीस, क्लास वन अधिकारी आणि स्वस्त दरात जमीन देण्यात येणार आहे. तसेच कुस्तीपटू रवी दहिया आणि बजरंग पुनिया यांच्या सोनीपत आणि झज्जर जिल्ह्यातील मूळ गावांमध्ये इनडोअर रेसलिंग स्टेडियम बांधले जाणार असल्याची घोषणा खट्टर यांनी केली.

बीसीसीआय आणि चेन्नई सुपर किंग्सकडून चोप्राला प्रत्येकी एक कोटींचे बक्षीस जाहीर केले. बीसीसीआयने इतर पदक विजेत्या भारतीय खेळाडूंना रोख बक्षिसांची घोषणाही केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विटद्वारे सांगितले ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानू आणि रवी दहिया यांना प्रत्येकी ५० लाख रुपये देण्यात येणार आहे. तर कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया, बॉक्सर लवलिना बारगोहेन आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू यांना प्रत्येकी २५ लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा शहा यांनी केली.

पंजाब मुख्यमंत्र्यांकडून दोन कोटींचे बक्षीस

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी निरजच्या यशाचे कौतुक करत २ कोटींचे रोख बक्षीस जाहीर केले.

यावेळी मुख्यमंत्री सिंग म्हणाले, संपूर्ण देशवासिय आणि पंजाबसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

लष्करात सेवा करणाऱ्या नीरज चोप्राचे मुळ कुटुंब पंजाबमध्ये आहे.

पुनिया आणि दहियाला सरकारी नोकरी

राज्य सरकारच्या पदक धोरणाअंतर्गत कांस्यपदक जिंकणाऱ्या पुनियाला अडीच कोटींचे रोख बक्षीस, स्वस्त दरात जमीन आणि सरकारी नोकरी दिली जाणार आहे.

ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारा दुसरा पैलवान रवी दहियाला क्लास वन अधिकारी स्वस्त दरात जमीन दिली जाणार आहे.

त्याशिवाय ४ कोटी रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणुन दिली जाणार आहे.

भारतीय हॉकी महिलांनी मदत

हरियाणा सरकारने भारतीय महिला हॉकी संघाच्या राज्यातील नऊ खेळाडूंना प्रत्येकी ५० लाखांचे बक्षीस देणार आहे.

तर ऑलिम्पिकमध्ये चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या राज्यातील खेळाडूंना ही ५० लाखांची रक्कम दिली जाणार आहे.

देशासाठी हॉकीमध्ये ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पुरुष हॉकी संघाला हॉकी मंडळाकडून प्रत्येकी १ कोटी २५ लाख रुपये देणार आहे.

तसेच अनेक खासगी कंपन्यांनी खेळाडूंना बक्षिसांची घोषणा केली आहे.

मणिपूरकडून मिराबाईला एक कोटी आणि नोकरी

मणिपूर सरकारने चानूला एक कोटी रुपये आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक (क्रीडा)चे नियुक्ती पत्र दिले होते.

या सरकारांकडून मदतीची घोषणा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भारतीय महिला हॉकी संघाची वंदना कटारियाला २५ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. तर झारखंड सरकारने आपल्या राज्याच्या खेळाडू असलेल्या सलीमा टेटे आणि निक्की प्रधान यांना ५० लाखांची घोषणा केली. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुरुष हॉकी संघाचा भाग असलेल्या विवेक सागर आणि निलाकांत शर्मा या दोन खेळाडूंसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Back to top button