असेही दातृत्व! जैन इरिगेशन सिस्टीमतर्फे शहर पोलीस स्टेशनमधील कैद्यांसाठी सतरंजी, चादर सुपूर्द | पुढारी

असेही दातृत्व! जैन इरिगेशन सिस्टीमतर्फे शहर पोलीस स्टेशनमधील कैद्यांसाठी सतरंजी, चादर सुपूर्द

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
रामनवमीच्या निमित्ताने जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या लॉकअप मधील कैद्यांना अंथरण्यासाठी सतरंजी व पांघरूण म्हणून सोलापुरी चादर भेट म्हणून देण्यात आल्या. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार पी. गुप्ता, जैन इरिगेशनचे चंद्रकांत जैन, अनिल जोशी यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्याकडे या वस्तू सुपूर्द करण्यात आल्या आहेत. लॉकअप मधील कैद्यांना या वस्तू वापरण्यासाठी सहकार्य व्हावे अशी अपेक्षा दीपककुमार गुप्ता यांनी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याकडे केली होती. त्यानुसार सदरच्या वस्तू गुरुवार (दि.१८) रोजी शहर पोलीस स्टेशनला सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा:

Back to top button