किंग खान शाहरुखसोबत काम करणं हे माझं स्वप्न : राधिका मदान | पुढारी

किंग खान शाहरुखसोबत काम करणं हे माझं स्वप्न : राधिका मदान

पुढारी ऑनलाईन डेस्क : एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील प्रत्येक कलाकार, मग त्याने ह्या इंडस्ट्रीत आपले नाव प्रस्थापित केले आहे किंवा नाव कमावण्याच्या मार्गावर आहे. महान अभिनेता शाहरुख खान सोबत स्क्रीन शेअर करण्याचे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. अलीकडेच अभिनेत्री राधिका मदनने त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

एका लॉन्चिंग सोहळ्यात अभिनेत्री राधिका मदानला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राधिका म्हणाली, “अरे देवा, शाहरुख सरांसोबत काम करणे हे माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होईल. त्यांच्यासोबत एकाच फ्रेममध्ये राहणे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे जेव्हा शाहरुख सर आणि मी एकत्र स्क्रीन शेअर करू.”

ती म्हणाली, “मला असे वाटते की, मला घाबरवणारी एकमेव भूमिका ती आहे जी मी करू शकत नाही. मला माझे पात्र असे हवे आहे की ते मला जागृत ठेवते. जेव्हा मी वेगवेगळ्या कथा घेऊन पडद्यावर येते तेव्हा प्रेक्षकांसाठी एक वेगळी व्यक्तिरेखा असली पाहिजे आणि फक्त एकच पात्र वेगवेगळे कपडे घातलेले नसावे. कारण एक प्रेक्षक म्हणून मला एकच प्रकारची पात्रं पाहायला आवडणार नाहीत आणि ती करायलाही मला आवडणार नाही. मला ते पाहण्यात आनंद वाटत नाही.”

अभिनेता शाहरुख खान प्रमाणेच राधिका मदानने देखील एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत आपला प्रवास टेलिव्हिजन शोमधून सुरु केला होता. सास, बहू और फ्लेमिंगो आणि साजिनी शिंदे यांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये ही अभिनेत्री शेवटची दिसली होती.

Back to top button